Horoscope Today 12 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 12 सप्टेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज संततीच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल, दुसऱ्यांना काही कळू न देता काही गोष्टी करणार आहात
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक परिस्थिती मनाजोगती राहिल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल, नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुम्ही साकारलेल्या नवीन योजनांना त्यांची दाद मिळेल, परदेश गमनाच्या संधी मिळतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल, महिलांचा घरामध्ये जास्त वेळ जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये जेवढे काम कराल त्या मानाने समाधान कमी मिळेल, धंद्यामध्ये स्पर्धक निर्माण होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज अनावश्यक कामासाठी बरीच शक्ती खर्च होईल, समोरच्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या अचूक अंदाजाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरात आनंदी आणि उत्साही वातावरण असेल. चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याकडे कल राहील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज आपली जबाबदारी टाळण्याकडे कल राहील, महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनातील संघर्षाची खळबळ समोर पाहणाऱ्याला जाणवणार नाही, आज तुमचा राग तुम्हाला आवरणार नाही
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस दाखवाल, प्रचंड आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला आपलेसे करून घ्याल
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा तिसरा आठवडा कसा जाणार? पितृपक्षाचा काळ कोणासाठी लकी? कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)