Horoscope Today 12 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 12 एप्रिल 2025, म्हणजेच आज हनुमान जयंती आहे, आजचा वार शनिवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घेतली तर कामे लवकर मार्गी लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेट संबंधित कामे पुढे जातील, महिला उत्साही राहतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या सहकाऱ्यांची मदत चांगली मिळेल, मुलांना काही गोष्टी समजावून सांगण्यात बरीच शक्ती खर्च होईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून अडकलेली कामे प्रगतीपथावर राहतील, त्याला थोडा कष्टाचा टेकू द्या
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी असलेल्या कलेची कदर करणारी मंडळी भेटतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज हातून चांगली निर्मिती होईल, त्यातून आर्थिक फायदाही मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांचे म्हणणे जिंकून घ्याल, घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक काम करताना तुम्हाला तेथे जातीने हजर राहावे लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल, तब्येत बिघडू नये याची काळजी घ्यावी
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील, पैसा मिळवण्यापेक्षा खर्च होण्याचे योग्य जास्त आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी अचानक आपले अभ्यासाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो सर्व गोष्टींचे विचार करून नियोजन केले तर यश मिळेल.
हेही वाचा..
Weekly Horoscope 14 To 20 April 2025: एप्रिलचा तिसरा आठवडा 'या' 4 राशींचे नशीब पालटणारा! नोकरीत पगारवाढ, करिअर जोरात? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)