Horoscope Today 11 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 11 मे 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस आज तुमचा उत्साह आणि ऊर्जा वाढलेली राहील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस करिअरमध्ये कौतुक होईल. मीडिया, डिजिटल किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांकडून मदत मिळेल. प्रेम जीवनात आनंद वाढेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. काहींना नवीन नोकरी किंवा प्रमोशनचे संकेत आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. आरोग्यही उत्तम राहील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. नशीबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. शिक्षण आणि करिअरमध्ये चांगली प्रगती दिसेल. प्रवासाचे योग संभवतात. मात्र थकवा जाणवू शकतो. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आज संयमाने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कामात काही अडथळे आले तरी शांतपणे परिस्थिती हाताळाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. नवीन लोकांशी ओळख वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आज मेहनतीचे चांगले फळ मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मानसिक ताण कमी होईल. आरोग्य चांगले राहील.. 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस आज खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल, करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. आरोग्य सामान्य राहील.. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आज नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. व्यवसायात फायदा होईल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता अनुभवता येईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस बदल आणि प्रगतीचे संकेत आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. मानसिक समाधान आणि सकारात्मकता वाढेल.

हेही वाचा

पुढचे 7 दिवस..5 राशींचा प्रगतीचा वेग दुप्पट, बंपर लाभ! पॉवरफुल रुचक राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)