Horoscope Today 11 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 11 मार्च 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज भावंडांशी न पटणे किंवा नको असणारी बातमी कानावर पडणे यासारख्या गोष्टी संभवतात
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मानसिक अस्थिरता येईल, आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज सतत द्वीधा मनस्थिती राहिल्यामुळे कामाची गती थोडी मंदावेल, आपल्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला जास्त खर्चिक बनतील. मानापमानाच्या कल्पना थोड्या टोकदारच होतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज ज्यांच्या नोकऱ्या नवीन आहेत, त्यांना वरिष्ठांच्या गैरमर्जीला तोंड द्यावे लागेल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज जेवढे काम कराल, त्यामानाने व्यवसायात लाभ कमी मिळेल, कष्टाचे डोंगर उपसाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये छोट्याशा कारणाने वाद होतील, वातावरण ढवळून निघेल, तब्येत मात्र सांभाळावी लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज परदेशी प्रवास घडतील, वडिलोपार्जित इस्टेट संदर्भात कामे मार्गी लागतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज एखाद्याने घर बांधायला घेतले असेल तर ती कामे पूर्ण होतील, आर्थिक गुंतवणूक ही कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिला घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थ करण्यात गुंतून जाल, एखादे निरीक्षण परीक्षण फार चांगल्या पद्धतीने कराल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास कराल, व्यवसाय धंद्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्तीचा सहवास लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज सहवासातील वृद्ध व्यक्तींचा सल्ला अवश्य विचारात घ्या, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्याल.
हेही वाचा>>
Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
