Horoscope Today 1 February 2025 : आज 1 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावाचा असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्यवसायात एखादी मोठी डील तुमच्या हातून सुटू शकते. त्यामुळे तुम्ही तणावात असाल. तसेच, आज जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणिण्याचा विचार करणार असाल. तर त्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. पालकांच्या मदतीने तुम्ही महत्त्वाची कामे पार पाडाल.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे जास्त चांगला नफा मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्ही चांगला बोध घ्याल. आज तुम्ही मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. तुमच्या आरोग्यात काहीसा चढ-उतार जाणवत राहील. तसेच, लवकरच कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. तसेच, परस्परातील मतभेद दूर होतील.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. या पाहुण्यांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.जुन्या कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुम्हाला अधिक लक्ष घ्यावं लागेल. आज रविवार असल्या कारणाने तुमच्या घरी संध्याकाळी पाहुणे येतील. किंवा तु्म्ही मित्र-मैत्रींणींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. आज विनाकारण कोणालाही पैसे देऊ नका. ते तुम्हाला परत मिळणार नाहीत. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवेल. अशा वेळी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे इतर दुखवू शकता. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, लहान मुलांबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात विचारांचा गोंधळ सुरु असेल तो थांबेल.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच आपल्या जीवनाचा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. तसेच, मित्रांबरोबरचा तुमचा सहवास जास्त काळ टिकणारा असेल. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींबरोबर तसेच, कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवू शकतो. तुम्ही बाहेर फिरायलाही जाऊ शकता. तसेच, जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असल्यास तुम्ही करु शकता. मात्र, एक गोष्ट दहा वेळा दहा ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे तुमच्याच कामात बाधा येण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. आज तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यात व्यस्त असाल. तसेच, कामाच्या प्रती तुमची एकाग्रता आज दिसून येईल. जर तुम्ही एखाद्याला वचन देत असाल तर नीट विचारपूर्वक द्या. तसेच, वाहनाचा वापर करताना सावधानता बाळगा. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, नोकरीत तुम्हाला कामाच्या वाढत्या ताणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा वेळी योग्य वेळी आहार आणि योग्य वेळी झोप घ्या. बदलत्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमच्या कुटुंबात आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामे पूर्ण करु शकाल. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आज नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जुने दीर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतात त्यामुळे काळजी घ्या. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला काहीसा मानसिक तणाव जाणवेल. मनासारखं काम पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीत पैसे गुतंवायचे असतील तर त्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2025 : आज माघी गणेश जयंती! 'अशी' करा बाप्पाची आराधना; वाचा पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ