Horoscope Today 1 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 1 एप्रिल 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस हमखास एखादी गोष्ट हक्काने जवळच्या व्यक्तींकडून करून घ्याल, ज्यामध्ये त्या व्यक्तीलाही आनंद मिळून जाईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस एकंदरीत चांगल्या गोष्टींची नांदी आज कराल, भावंडांबरोबर मतभेद झाले तर त्याची कारणे न समजल्यामुळे थोडेसे गोंधळून जावे
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस खूप काही करायची उर्मी मनामध्ये बाळगाल, त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नोकरी धंद्यात अडलेली कामे उत्साहाने मार्गी लावाल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारेल महिलांनी थोडा तापटपणा ताब्यात ठेवावा, मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस संतती सौख्यासाठी उत्तम दिवस कधी कधी कोठे काय बोलावे, याचा पेच थोडा कमी राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सामावून न घेतल्यामुळे मनातून जरा खट्टू व्हाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस आज अनेक गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार केला तर जास्त दुःख होणार नाही, मित्र-मैत्रिणींच्या सहवासात रमून जाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मैत्रीचा अमोल ठेवा आनंदाचे लेणं घेऊन येईल आणि तेथे मन रमून जाईल, व्यवसायात भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येईल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आज तुमच्यासमोर असलेल्या इतर पर्यायांकडे लक्ष द्यावे लागेल, कधी कधी धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था होऊन जाईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस अनेक गोष्टींचा समतोल राखावा लागेल, नको त्या गोष्टींमध्ये अडेल. हट्टीपणा केला नाही तर फायद्याचे ठरेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस महिलांना घरामध्ये जास्त लक्ष द्यावे लागेल, त्याची थोडी चिडचिड होईल, आज घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस वडीलधाऱ्या मंडळींचे विचार तुम्हाला पटणार नाहीत, तेथे थोडे खटके उडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
April 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं नशीब पालटणार! एप्रिल महिना मोठ्या सरप्राईझचा, 6 पैकी 3 राशींची लॉटरी! मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
