Horoscope Today 09 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमच्या कुटुंबात आज काही वाद निर्माण होतील, ज्यामुळे तुम्ही तणावात दिसाल. नोकरदार वर्ग कामात व्यस्त दिसेल. आज तुमचं काही नुकसानही होऊ शकतं. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरू केला असेल, तर त्यातही तुम्हाला चांगला नफा न मिळाल्यास तुम्ही थोडे निराश होऊ शकता. तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळी जाता येईल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनी त्यांच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला दुखापत होईल, त्यामुळे तुम्ही वाहन जपून चालवावे. कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडा, अन्यथा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर रागावतील. तुमचा एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कोणाशीही काही बोलण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीचे लोक काही नवीन काम सुरू करू शकतात. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला काही नवीन योजनेबद्दल सांगतील आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तुमची कोणतीही दीर्घकाळ प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today) 


कर्क राशीच्या लोकांनी कोणत्याही वादविवादापासून दूर राहावं. आज कोणतीही मोठी जोखीम पत्करू नये. तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा टिकवून ठेवावा लागेल. तुम्हाला न विचारता कोणालाही सल्ला देणं टाळावं लागेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. जर तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर तुम्ही ती अजिबात धरू नका. विद्यार्थ्यांनी इतर कामं बाजूला ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.


सिंह रास (Leo Horoscope Today) 


सिंह राशीच्या लोकांसाठी, व्यवसायात काही मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी खास असेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आदर वाढेल. नोकरदारांना सहकाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं वाईट वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वडिलांशी बोलू शकता. ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल आणि तुमच्या जोडीदाराला नवीन नोकरी मिळू शकते.


कन्या रास (Virgo Horoscope Today) 


कन्या राशीच्या लोकांचं मन आज चलबिचल राहील, कारण त्यांच्याकडे काम जास्त असणार आहे. व्यवसायात तुम्ही काही नवी योजना आखू शकता, परंतु भागीदार तुमचा मोठा विश्वासघात करू शकेल, ज्यामुळे तुम्ही निराशा होणार आहात. त्यामुळे विचार करूनच कोणाकडेही हात पुढे करावा. तुम्ही कोणताही मोठा व्यवहार करू नका, कारण ते तुमच्यासाठी नुकसानीचं ठरेल.


तूळ रास (Libra Horoscope Today) 


तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस तुमचा मान वाढवणारा आहे. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता, जी तुमच्यासाठी चांगली असेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला तुमच्या कामात सहकार्य करतील. तुमचे काही नवीन संपर्क तुमच्यासोबत व्यवसायात चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. तुम्ही तुमच्या वडिलांना बाहेर कुठेतरी सहलीला घेऊन जाऊ शकता. तुमच्या मुलांच्या मनमानी वागण्यामुळे तुम्ही त्यांच्यावर रागवाल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today) 


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक काम करण्याचा आहे. कोणत्याही वादापासून स्वतःला दूर ठेवलं तर बरं होईल. तुमच्या जोडीदाराला रागाच्या भरात काहीही बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्याने त्याला/तिला वाईट वाटू शकतं. व्यवसायातही तुमचे काही शत्रू तुमचं नुकसान करण्याची एक संधी सोडणार नाहीत. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे.


धनु रास (Sagittarius Horoscope Today) 


धनु राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी ठरणार आहे. तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल, जे तुमच्या व्यवसायात मोलाची भर घालतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊ शकता. तुम्ही तुमच्या कामात आळशी होऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आरोग्य ठणठणीत राहील.


मकर रास (Capricorn Horoscope Today) 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमचा कोणताही जुना वाद संपुष्टात येईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील. तुमच्यासाठी काही नवीन काम सुरू करणं चांगलं राहील, ज्यामध्ये तुमचे कुटुंबीयही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थ्यांची अभ्यासाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं, जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today) 


कुंभ राशीच्या लोकांनी थोडं सावध राहावं लागेल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही निराश होऊ शकता. लांबच्या प्रवासाला गेल्याने तुमचं नुकसान होईल. जर तुम्ही एखाद्याला काही उधार दिलेत तर तुम्हाला ते परत मिळण्यात अडचणी येतील. काही शारीरिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुम्ही तुमच्या कामात कोणतीही रिस्क घेतल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.


मीन रास (Pisces Horoscope Today) 


मीन राशीच्या लोकांच्या तब्येतीत काही बिघाड झाला असेल तर तो बरा होऊ शकतो. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना मोठं पद मिळाल्यास त्यांचे मनोबल उंचावेल आणि ते आनंदी राहतील. कुटुंबातील सदस्य त्यांच्यासाठी सरप्राईज पार्टी आयोजित करू शकतात. नवीन वाहन घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एखाद्याच्या सल्ल्याने कोणतंही काम करू नका, अन्यथा त्यात काही चूक होण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 09 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार बजरंगबलीची कृपा; मार्गात येणारे अडथळे होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य