Horoscope Today 09 August 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....


तूळ रास (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. अधिकारीही तुमच्यावर खुश नसतील. 


व्यापारी (Business) - व्यापारी वर्गातील जे लोक आहेत त्यांनी आज आपल्या ग्राहकांबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. अन्यथा तुमच्या व्यवहारात नुकसान होऊ शकतं. 


कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना धार्मिक स्थळी घेऊन जा. 


आरोग्य (Health) - वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या. 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्या. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा. घरी त्याबाबत बोलू नका. अन्यथा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. 


व्यापार (Business) - आज तुमची कामाच्या बाबतीत एखादी डील तुम्हाला अचानक कॅन्सल करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला तणावाचा सामनाही करावा लागेल. 


तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एकमेकांचे मतभेद असू शकतात. 


आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट कळत नसेल तर सहकाऱ्यांचं सहकार्य घ्या. 


व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्ही तुमचा सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यात व्यस्त असाल. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देखील मिळतील. 


महिला (Women) - महिलांनी आपल्या स्वभावातील रागीटपणा जरा कमी करावा. तसेच, जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. 


आरोग्य (Health) - सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Nag Panchami 2024 : श्रावणमासातील पहिला सण नागपंचमीचा! या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा...