Astro Tips : आजकाल लग्नानंतर लगेच हनिमूनला (Honeymoon) जाणं फार सामान्य बाब झाली आहे. अनेक जोडपी लग्नाची तारीख ठरवण्याआधीच हनिमूनचा प्लॅन करतात. कुठे जायचं? कसं जायचं? कुठे थांबायचं? या सगळ्याची आधीपासूनच तिकीट बुकिंग करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का भारतीय परंपरेत याची पद्धत मात्र वेगळी आहे. 

हिंदू धर्मशास्त्रानुसार, लग्नानंतर जोडप्यांनी कमीत कमी 45 दिवसांनंतर हनिमूनला किंवा कोणत्याही प्रवासाला जाणं योग्य आहे. यामागे फक्त परंपराच नाही तर वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण देखील आहे. 

लग्नानंतर 45 दिवसांनीच का हनिमूनला जावं? 

हिंदू धर्मशास्त्रानुसार, लग्नानंतर जोडप्यांसाठी विशेषत: नववधूसाठी हे 45 दिवस फार महत्त्वाचे असतात. नवीन घर, नवीन वातावरण, नवीन नात्यात स्वत:ला सामावून घेण्यासाठी तसेच सामंजस्य निर्माण करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनात्मकदृष्ट्या स्वत:च्या मनाची तयारी करुन घ्यावी लागते. 

शास्त्रात या प्रक्रियेला ‘ऋतु शुद्धि’, ‘गृहस्थ व्रत’ तसेच ‘गर्भ संयम’ असं म्हटलं आहे. या काळात नवविवावहीत वधूला हार्मोनल बॅलेन्स, मानसिक स्थिरता आणि ग्रहांच्या प्रभावावर ताळमेळ ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. 

शास्त्रात काय म्हटलंय? 

हिंदू धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की, लग्नानंतर नवीन वैवाहिक जीवनात संतुलन राहण्यासाठी नववधूला रुढी, परंपरा, मान-सन्मान या गोष्टी आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे. या काळात फक्त शारीरिक अनुकूलताच नाही तर मन, नातेसंबंध आणि नवीन जबाबदाऱ्या देखील समजून घेणं आवश्यक आहे. 

'हे' तीन टप्पे आवश्यक 

शास्त्रात योनी संयोजनाचे तीन टप्पे सांगण्यात आले आहेत. 

प्रारंभिक संयोजन (पहिले 7 दिवस) : या दरम्यान शरीर आणि मनाला पूर्णपणे आराम द्यायचा असतो. जेणेकरुन नववधूचं मन स्थिर राहील. 

मध्य संयोजन ( 8 ते 21 दिवस) : या कालावधीत भावनिक ताळमेळ आणि वैवाहिक जीवनातील नवीन पद्धती समजून घेण्याची प्रक्रिया सुरु होते. 

पूर्ण संयोजन (22 ते 45 दिवस) : या दरम्यान ऊर्जेचं संतुलन निर्माण करणं, ग्रहांची स्थिती समजून घेणं आणि नवीन नाती निर्माण करणं, नात्यांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे कोणत्याही नवविवाहित दांपत्याला सुखी संसारासाठी या प्रक्रिया पार करणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                                                                                                        

Shani Kendra Yog : कर्मफळदाता शनी आणि गुरुचा होतोय संगम; 15 जूनपासून 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात खेळणार पैसाच पैसा