Holika Dahan 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा करतात. त्यानुसार, आज देशभरात होळीचा (Holi 2025) सण साजरा केला जाणार आहे. शास्त्रानुसार, 14 मार्चचा दिवस धूलिवंदनाचा आहे तर, आजच्या दिवशी होलिका दहन करण्याचा आहे. मात्र होलिका दहन करण्यापूर्वी घराच्या सुख-समृद्धीसाठी काही गोष्टी घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या घरात ठेवल्यास घरात नकारात्मकता पसरते.
'या' गोष्टी घराबाहेर काढा
जुने रंग काढा
अनेकदा आपण होळीसाठी घरातच अडगळीच्या ठिकाणी ठेवलेले जुने रंग वापरतो. मात्र, वास्तूच्या दृष्टीने असं करणं चुकीचं आहे. जुने रंग वापरल्यामुळे तुमच्या त्वचेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच, या रंगांचा गंध देखील उडून जातो. त्यामुळे हे जुने रंग घराबाहेर काढा.
जुने कपडे बाहेर काढा
जर तुमच्या घरात जुने वापरात नसलेले कपडे असतील तर होलिका दहनाच्या आधी घराबाहेर काढा. तसेच, हे कपडे तुम्ही गरजू व्यक्तीला देखील दान करु शकता. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू
वास्तू शास्त्रानुसार, तुटलेल्या किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू कधीच घरात ठेवू नयेत. कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच, कुटुंबातील सुख-शांतीवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
13 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजून 36 मिनिटांपासून ते या दिवशी रात्री 11 वाजून 29 मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च 2024 च्या रात्री 11 वाजून 30 मिनिटांपासून ते रात्री 1 वाजून 04 मिनिटांपर्यंत असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: