Holi 2024 Vastu Tips:   महाशिवरात्री (Mahashivratri 2024)  संपल्यानंतर होळीची (Holi 2024) तयारी सुरू होते.   राज्यासह देशभरात धुळवडीचा उत्साह (Holi Celebration) धुमधडाक्यात साजरा करण्यात येतोय . अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुलीवंदन साजरी करण्यात येते.  यंदा 25 मार्चला धुलीवंदन साजरे करण्यात येणार आहे. तर होलिका दहन हे 24 मार्चला होणार आहे. होळीला शिमगा देखील म्हटले जाते. होळीच्या दिवशी  अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे.  खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे.  वास्तुशास्त्रात (Vastu Tips)  देखील विशेष महत्त्व आहे. 


वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या घरी आणणे फलदायी असते.  त्यामुळे होळीपूर्वी या वस्तू घरी आणल्या पाहिजेत. होलाष्टक (होलाष्टक 2024) आणि होळी दरम्यान तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. होलाष्टक 17 ते 24 मार्च दरम्यान आहे. या वस्तू घरात आल्याने माता  लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरात सुख-समृद्धी नांदते. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया


होळीपुर्वी घरी आणा या गोष्टी (Holi 2024 Shopping)


तोरण (Toran) - हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दरवाजावर आंब्याचे तोरण लावले जाते. आंब्याच्या पानांचे, झेंडुच्या फुलांचे तोरण लावले जाते. तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दारत तोरण लावल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे होलाष्टकापासून म्हणजे 17 मार्च ते  शिमग्यापर्यंत म्हणजे 24 मार्चपर्यंत दरवाजाचा तोरण लावावे.


बांबुचे रोप (Bamboo Plant): वास्तुशास्त्रात बांबुचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. होळीपूर्वी घरामध्ये बांबुचे रोप आणावे. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-समृद्धी वाढते.


चांदीचे नाणे  (Silver Coin):  होळीची खरेदी करताना चांदीचे नाणे नक्की विकत घ्या. चांदीच्या नाण्याची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात.


कासव  (Tortoise): वास्तूशास्त्र आणि हिंदू धर्मात कासव पवित्र मानले जाते आणि धातू शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही होळीच्या दिवशी घरासाठी धातूपासून बनवलेले कासवही आणू शकता.  कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असायला हवं.  धातूचे कासव घरी आणून तुम्ही ते पुजेच्या ठिकाणी ठेवा.यामुळे घरात लक्ष्मीचा वास करते असे मानले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Chandra Grahan: चंद्र ग्रहणामुळे यंदा होळीच्या रंगाचा होणार भंग; जाणून घ्या, वर्षातील पहिल्या ग्रहणाबाबतची इंतभूत माहिती