Kashi Vishwanath Temple: भारतात अनेक देवी-देवतांची विविध पौराणिक मंदिरं आहेत, ज्या ठिकाणी भाविकांच्या स्वत:च्या श्रद्धा आहेत. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर.. या मंदिराबद्द अशी मान्यता आहे की, हे एक असे ठिकाण आहे, जिथे अंत आणि सुरुवात एकत्र येतात. जिथे भगवान शिव आणि भगवान नारायण राहतात. सध्या हे मंदिर खूप चर्चेत आहे, कारण या मंदिराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर एक पांढरे घुबड दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यावरून विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. कोण म्हणतं नवं संकट येणार.. तर कोण म्हणतं हे तर शुभ संकेत. यावरून सोशल मीडियावर अनेक ज्योतिषी आपले मत व्यक्त करतानाही दिसत आहेत. जाणून घेऊया..

घुबड दिसल्यानंतर विविध अंदाज बांधले जातायत..

ही घटना 20 ऑगस्ट 2025 ची आहे, जेव्हा काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर पांढरे घुबड बसलेले दिसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. पौराणिक ग्रंथांनुसार, पांढरे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. शिखरावर बसलेले घुबड असे आहे की ते आपोआप लोकांचे लक्ष वेधून घेते आणि लवकरच काहीतरी शुभ घडू शकते असे सूचित करते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही ही घटना खूप शुभ मानली जात आहे. कारण, शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीचे वाहन पांढरे घुबड हे शांती, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे. घुबड दिसल्यानंतर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. ज्योतिष तज्ज्ञ आणि पुराणांमधून पांढरे घुबड पाहण्याचे महत्त्व जाणून घेऊया. 

पांढरे घुबड कुठेही सहज दिसत नाहीत, धार्मिक महत्त्व काय?

ज्योतिषी म्हणतात, पांढरे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहे. पांढरे घुबड कुठेही सहज दिसत नाहीत. अशात, काशीमध्ये पांढऱ्या घुबडाचे आगमन हे देखील देवी लक्ष्मीचे आगमन झाल्याचे लक्षण आहे. पांढरे घुबड दिसल्याचा परिणाम भारतावर दिसून येणार असल्याचं ज्योतिषी सांगत आहेत. सरकार लवकरच धार्मिक क्षेत्रात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोकांमध्ये आनंदाची लाट येऊ शकते. त्याचबरोबर देशाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे. म्हणजेच, येत्या काळात सरकार मोठा आर्थिक निर्णय घेऊ शकते. सध्या जीएसटी दुरुस्तीचीही चर्चा सुरू आहे, अशा परिस्थितीत ही घटना घडणे हे आणखी शुभ आहे जे देशासाठी प्रगतीशील ठरेल.

भारताला फायदा?

ज्योतिषी असेही म्हणत आहेत की ग्रहांची स्थिती अशी आहे की येत्या काही महिन्यांत अमेरिका देखील टॅरिफवरील आपला निर्णय बदलू शकते, ज्यामुळे भारताला फायदा होईल. त्याच वेळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काशीचे खासदार आहेत, त्यामुळे काशीला सरकारकडून भेट मिळण्याची शक्यता आहे.

सौभाग्याचे निर्देश 

पंचांगानुसार, बुधवार, 20 ऑगस्ट रोजी त्रयोदशीनंतर चतुर्दशी तिथीचा योगायोग होता. जो भगवान शिवाला समर्पित आहे. अशात, पांढऱ्या घुबडावर स्वार होऊन देवी लक्ष्मी शिवाच्या निवासस्थानी येणे खूप शुभ आहे आणि सौभाग्याकडे निर्देश करते.

शास्त्रांमध्ये पांढऱ्या घुबडाचे महत्त्व

शास्त्रांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पांढरे घुबड दिसले तर ते सूचित करते की, येत्या काही दिवसांत तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या संपतील. जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही बरोबर घडत नसेल, तर जर त्याला पांढरे घुबड दिसले तर ते सकारात्मकतेकडे निर्देश करते. शास्त्रांनुसार, पांढरे घुबड दिसणे हे देखील सूचित करते की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूश आहेत आणि ते तुमच्यासोबत आहेत, म्हणून तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)