Hindu Religion: मोठा पगार...चांगली नोकरी... प्रत्येकाला वाटतं आपला ड्रीम जॉब आपल्याला लवकरात लवकर मिळावा...अभ्यासात एखादी पदवी मिळवल्यानंतर चांगली नोकरी मिळवणे हे प्रत्येकासाठी सर्वात मोठे आव्हानात्मक काम आहे. अनेकवेळा मेहनत करूनही मुलाखतीत वारंवार अपयश येते. अशा परिस्थितीत व्यक्ती निराश आणि हतबल होते. कठोर परिश्रम करूनही यश का मिळत नाही? हे समजणे कठीण होते. खरं तर मेहनतीसोबत नशीबही खूप महत्त्वाचं असतं. तुम्हालाही नोकरी मिळण्यात वारंवार अडथळे येत असतील तर काही खास उपाय करून तुम्ही या समस्येवर उपाय शोधू शकता. योग्य दिशेने प्रयत्नांसोबत काही खास उपाय केलेत, तर यश मिळण्याची शक्यता वाढते.
मुलाखतीला जाण्यापूर्वी फक्त 'हे' करा
जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वारंवार अपयश येत असेल तर भगवान हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरू शकते. ज्या दिवशी तुम्हाला मुलाखत द्यायची आहे, त्या दिवशी एक लिंबू आणि चार पूर्ण लवंगा घेऊन हनुमान मंदिरात जा. लिंबाच्या भोवती लवंग टाका, हातात धरा आणि हनुमानांसमोर बसून 'ओम श्री हनुमंते नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर या लिंबूला हनुमानजींच्या चरणांनी स्पर्श करा आणि सोबत आणा. मुलाखतीच्या वेळी हाच लिंबू सोबत ठेवा. याशिवाय रोज हनुमान चालिसाचे पठण करावे.
शिवलिंगाला जल अर्पण कधी कराल?
नोकरी मिळण्यास विलंब होत असेल तर सोमवारचा उपवास करून शिवलिंगाला जल अर्पण करावे. तसेच शिवलिंगावर संपूर्ण तांदूळ अर्पण करा. तांदूळ तुटणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. हे तुम्हाला तुमच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकते.
मोहरीच्या तेलाचा दिवा कधी लावाल?
सतत प्रयत्न करूनही तुमच्या कामात अडथळे येत असतील तर शनिदेवाची पूजा करा. प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि 'ओम शम शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने शनिदेवाची कृपा होते आणि त्यांच्या कृपेने जीवनातील आणि नोकरीतील अडथळे दूर होतात.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )