Hindu Religion: पूजा करणं म्हणून मनाला शांती लाभणं... पूजा करणं म्हणजे देवाशी एकरुप होणं...पूजा करणं म्हणजे आपलं देवावरील प्रेम व्यक्त होण... पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवापर्यंत पोहचणं... हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरात रोज पूजा केली जाते. भगवंताशी भक्तीने जोडलेले राहणे हाच दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. देवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं. पण असं का होतं? याचा खरा अर्थ काय? भक्ताकडून एखादी चूक तर नाही झाली ना? काय सांगितलंय शास्त्रात? काय सांगतात ज्योतिषी? जाणून घ्या..


भक्तीचा मार्ग खूप कठीण?


काही लोक आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात, देवाची भक्ती हा आपल्या जीवनाचा आधार मानतात. तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे, पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे. अनेकवेळा हा विचार मनात येतो की, आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहेत की नाही. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या वरून तुम्ही देवाच्या जवळ असल्याचे संकेत दिसतात.


पूजा करताना डोळ्यातून अश्रू येतात?


ज्योतिषी सांगतात, पूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे, अश्रू येणे, झोप येणे आणि शिंका येणे हे मोठे रहस्य आहे. जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात? हे अश्रू आपल्या उपासनेचे यश दर्शवतात का? पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ तुमच्या मनातील दु:ख लवकरच संपणार आहे. तसेच, तुम्ही दुष्टांवर मात करू कराल. पूजेच्या वेळी अश्रू येणे हे देखील स्वच्छ मनाचे लक्षण असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. या काळात तुम्ही समजले पाहिजे की, तुम्ही तुमच्या मनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवला आहे.


अनेक प्रकारचे विचार येतात


शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना देव नेहमी स्वीकारतो. पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली, तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतो. त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. जर तुम्ही अशांत अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हाला झोप येऊ लागते.


पूजा करताना हात जळणे


दिवा लावताना किंवा कोणताही विधी करताना तुमचा हात जळत असेल तर याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे. अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा.


पूजा यशस्वी होण्याची चिन्हे


जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागते, तेव्हा समजून घ्या की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाला आहे. पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आले तर याचा अर्थ देव तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आहे. 


हेही वाचा>>>


Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )