Hartalika and Ganesh Chaturthi : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हरतालिकेनंतर दुसर्‍या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र 2026 मध्ये तिथीच्या गणनेमुळे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी असणार आहेत. त्यामुळे यंदा या दोन्ही सणांचे धार्मिक महत्त्व तर वाढलेच आहे. शिवाय हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा, गणपतीची स्थापना कधी करायची, पूजा कशी करायची, याबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येण्याचे कारण काय?

या वर्षी 2026 मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहे, साधारणपणे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाही. हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यात शुल्क पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि  गणेश चतुर्थी चतुर्थी तिथीला येते. मात्र, या वर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच महिलांकडून हरतालिकेची पूजा केली जाणार आहे. एकीकडे माता पार्वती आणि भगवान शिवाची पूजा, तर दुसरीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन असा दुहेरी धार्मिक उत्सव या दिवशी पाहायला मिळणार आहे.    

हरतालिका व्रताचे महत्त्व काय?  

हरतालिका व्रत हे प्रामुख्याने माता पार्वती आणि भगवान शंकर  यांना समर्पित आहे. विवाहत महिला आपल्या पतीच्या  दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा या इच्छेने हरतालिकेचे व्रत करतात. असे म्हटले जाते की हरतालिका पूजेसाठी वापरलेले वाळूची मूर्ती पूजेचे साहित्य याचं विसर्जन केल्यानंतर गणपतीची स्थापना करावी.

Continues below advertisement

पैराणिक मान्यतेनुसार माता  पार्वती भगवान शंकराना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती.  त्याच तपश्चर्येचे स्मरण म्हणून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.  त्यामुळे या दिवशी शिव-पार्वतीची पूजा करून हा उपवास केला जातो.

यंदा हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा?

हरतालिका व्रताची पारंपरिक पद्धत पाहिली तर अनेक महिला हे व्रत दिवसभर उपवास करून करतात. काही ठिकाणी हा उपवास निर्जला केला जातो. म्हणजेच अन्नासोबत पाणीही घेतले जात नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून उपवास सोडण्याची परंपरा आहे.

हरतालिका व्रताचे महत्त्व काय?

मात्र यंदा 14 सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी असल्यामुळे परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा याबाबत घराघरांत चर्चा सुरू आहे.वर्ष 2026 मध्ये हरतालिका व्रत 14 सप्टेंबर 2026 सोमवार रोजी आहे. हा उपवास 14 सप्टेंबरच्या सूर्योदयापासून सुरू केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी स्नान व उत्तरपूजा करून व्रताची पारण केली जाते.

15 सप्टेंबरला उपवास सोडण्याची पद्धत

यंदा हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांनी 15 सप्टेंबर रोजी सकाळी गणपतीची आरती केल्या नंतर घरच्या परंपरेनुसार पूजा झाल्या वर  उपवास सोडावा, अशी पद्धत काही ठिकाणी सांगितली जात आहे.

उपवास करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

हरतालिकेचा उपवास कठीण मानला जातो. विशेषतः निर्जला उपवास करताना शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने उपवास करण्यास अडचण असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या प्रकृतीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आजारपण, औषधे सुरू असणे, गर्भावस्था किंवा इतर आरोग्याविषयी समस्या असल्यास कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

2026 मध्ये 14 सप्टेंबर रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी केली जाणार आहे 

यानंतर याच दिवशी घराघरांत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होईल. गणेशमूर्तीची स्थापना करून गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली जाईल. त्यामुळे एकाच दिवशी शिव-पार्वतीची आराधना आणि गणरायाचे स्वागत करण्याचा योग यंदा भक्तांना मिळणार आहे.

14 सप्टेंबर 2026 ला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने सकाळी प्रथम हरतालिकेची पूजा करून निर्जला उपवास करावा आणि नंतर गणपतीची स्थापना करावी. शास्त्रानुसार हा उपवास दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर सकाळी बाप्पाची आरती झाल्यावरच सोडावा. अशा प्रकारे पूजा केल्याने दोन्ही सणांचे पूर्ण फळ मिळते.

पूजेची वेळ आणि तिथी 

तृतीया तिथीची सुरुवात : 13 सप्टेंबर 2026, सकाळी 07:08 वाजतातृतीया तिथीची समाप्ती : 14 सप्टेंबर 2026, सकाळी 07:06 वाजता

14 सप्टेंबरसाठी शुभ मुहूर्त :

सकाळी हरतालिका पूजेचा मुहूर्त : सकाळी 06:26 ते 07:06 पर्यंत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम