Hartalika 2025 : हिंदू शास्त्रानुसार, गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) एक दिवस आधीच हरतालिकेचा (Hartalika) उपवास केला जातो. महिलांसाठी हा खास दिवस असतो. यंदा 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला हरतालिकेचा उपवास करतात.

हरतालिकेला महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच, या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असं म्हणतात, हरतालिकेचा उपवास हा देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी केला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. मात्र, यंदा जर तुम्ही पहिल्यांदाच हरतालिकेचा उपवास आणि पूजा करणार असाल, तर काही नियमांचं पालन करणं गरजेचं  आहे. 

हरतालिका उपवासाचे काही नियम

  • हरतालिका व्रताचा पहिला नियम असा आहे की, हा उपवास निर्जळी करावा. उपवासाच्या दरम्यान अन्न, दूध, फळ आणि पाणी ग्रहण केलं जात नाही. ज्या महिला आरोग्याच्या कारणास्तव हा उपवास धरु शकत नसतील त्यांनी उपवास करु नये. 
  • जर तुम्ही निर्जळी उपवास धरु शकत नसाल आणि पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तृतीया तिथीला सूर्यास्तानंतर रात्री 12 वाजल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. 
  • हरतालिकेच्या व्रतात झोपण देखील वर्ज मानलं जातं. या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी आणि त्यांच्या नामाचा जप करावा. हरतालिकेचा उपवास तृतीया तिथीपासून सुरु होऊन सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत हा उपवास केला जातो. 
  • हरतालिकेचा उपवास करताना पूजेच्या वेळी देवी पार्वती, भगवान शंकर आणि गणरायाची पूजा मातीपासून बनवलेल्या मूर्तीने केली जाते. 
  • या दिवशी महिला देवी पार्वतीला सौभाग्याचं सर्व सामान अर्पण करतात. या दिवशी महिलांच्या माहेरुन जी साडीसह जे काही सौभाग्याचं लेणं येतं ते परिधान करुन महिला तयार होतात.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                    

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य