Happy New Year 2026: आज 2025 वर्षाचा शेवटचा दिवस.. आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. 2026 नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या वर्षातील काही चांगल्या आणि वाईट, गोड आणि आंबट आठवणी मागे राहतील. येणारे नवीन वर्ष सर्वांना समृद्धी, यश आणि आनंद घेऊन येईल अशी प्रत्येकाची इच्छा असेल. तुमच्या आयुष्यासोबतच, तुमच्या नातेवाईकांचे, मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे जीवनही समृद्धी, प्रगती आणि संपत्तीने भरलेले असावे अशी तुमची इच्छा आहे. ही इच्छा लक्षात घेऊन, जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर कृपया येथे काही निवडक नवीन वर्षाचे संदेश पाठवून तर बघा...(Happy New Year 2026 Wishes In Marathi)
2026 नववर्षाच्या हटके शुभेच्छा प्रियजनांना द्या!
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद,
नाविन्याची कास धरत,
नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
नव्या वर्षाचे आगमन
संस्कृती आपली जपूया
देव- थोरा-मोठ्यांच्या चरणी,
मस्तक आपले झुकवू या,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
सरतं वर्ष जातंय आपल्यापासून दूर
शंका- कुशंका, राग-रुसवे
नव्या वर्षात संपून जाऊ दे,
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
भोवर्यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ-उतारांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी तुमची साथ मिळावी,
हीच आशा...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy New Year 2026
मनामनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष्य दिवे…
समृध्दीच्या या नजरांनी
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy New Year 2026
हे आपल नातं असंच राहु दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2025 वर्षाचा
2026 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
नवीन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy New Year 2026
सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना,
नव्या वर्षात पूर्ण होऊ दे अधुरी ही कहाणी,
हीच प्रार्थना होऊन नतमस्तक,
गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा,
Happy New Year 2026
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2025 चा प्रवास,
अशीच राहो 2026 मध्येही आपली साथ,
Happy New Year 2026
नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात,
या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा,
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास,
तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
पाकळी-पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने,
फुलांचेही व्हावे गाणे,
असे जावो वर्ष नवे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
हे नववर्ष तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी,
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026