Hanuman Jayanti Lucky Zodiac Signs 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह 2 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाचं हे संक्रमण संध्याकाळी 3 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी 5 राशींच्या करिअर आणि व्यवसायावर चांगला परिणाम दिसून येईल. या लकी राशी (Zodiac Signs)कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
हनुमान जयंती शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti 2026 Shubh Muhurta)
चैत्र पौर्णिमा तिथी प्रारंभ : 1 एप्रिल, 2026, सकाळी 07:06 वाजता
चैत्र पौर्णिमा तिथी समाप्ती : 2 एप्रिल, 2026, सकाळी 07:41 वाजता
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या अकाराव्या चरणात मंगळ आणि शनि ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत भरभराट पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये देखील तुम्हाला चांगलं यश मिळेल. मंगळ आणि शनि ग्रहाच्या युतीने तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनिची युती फार लाभदायी ठरणार आहे. या कालखंडात तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. जे लोक व्यवसायिक आहेत त्यांना या कालावधीत चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनि ग्रहाची युती शुभकारक ठरणार आहे. मंगळ आणि शनि ग्रहाच्या युतीने तुम्हाला सकारात्मक प्रभाव दिसून येईल. संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. तसेच, तुम्हाला तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हेल्दी खा आणि हेल्दी राहा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना शनि आणि मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवता येईल. तसेच, तुमचं आरोग्य निरोगी असणार आहे. भगवान हनुमानाचा तुमच्यावर कृपा असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त या कालावधीत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभकारक ठरणार आहे. या कालावधीत तुमची आर्थिक भरभराट होईल. उत्पन्नाची अनेक साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. गुंतवणुकीतूनही तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
