Guru Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रात देवगुरु ग्रह बृहस्पतीचं (Jupiter) संक्रमण फार महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. देवगुरु ग्रह बृहस्पती ज्ञान, प्रसिद्धी आणि समृद्धीसाठी कारक ग्रह मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, हा फार शुभ ग्रह मानला जातो. असं म्हणतात देवगुरु ग्रह बृहस्पती ज्या कुंडलीत मजबूत असतो त्यांना धन-संपत्ती आणि मान-सन्मान मिळतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाच्या सुरुवातीला गुरु ग्रह वृषभ राशीत स्थित होते. त्यानंतर 15 मे रोजी गुरु ग्रहाचा मिथुन राशीत झाला. दिवाळीच्या आधी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत गुरुने अतिचारी अवस्थेत प्रवेश केला. आता 12 नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहेत. गुरु ग्रहाची ही वक्री चाल चार राशींसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
गुरु ग्रहाच्या वक्री अवस्थेमुळे वृश्चिक राशीला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली स्थिरता निर्माण होईल. मुलांकडून तुम्हाला शुभवार्ता देखील मिळू शकते. तसेच, समाजात मान-सन्मान टिकून राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
गुरु ग्रहाच्या वक्री चालीने मिथुन राशीला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कुटुंबातील तणाव हळुहळू दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :