Guru Vakri 2025 : अवघ्या काही दिवसांतच गुरुची वक्री चाल; 5 डिसेंबरपर्यंत 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य, पैशांचा पडणार धो-धो पाऊस
Guru Vakri 2025 : 11 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत गुरु कर्क राशीत वक्री राहील, आणि त्यानंतर तो मिथुन राशीत वक्री होईल. कर्क राशीतील ही वक्री चाल काही राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरु शकते.

Guru Vakri 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 11 नोव्हेंबर 2025 पासून गुरु ग्रह कर्क राशीत वक्री (Guru Vakri) होत आहे. कोणत्याही ग्रहाची वक्री चाल ही आत्म-परीक्षण आणि भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेण्याची संधी देते. 11 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत गुरु कर्क राशीत वक्री राहील, आणि त्यानंतर तो मिथुन राशीत वक्री होईल. कर्क राशीतील ही वक्री चाल काही राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरु शकते. गुरु वक्रीचा चांगला परिणाम खालील राशींवर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात ज्योतिष शास्त्रज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
'या' राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता
कन्या रास (Virgo Horoscope)
- हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो.
- गुरू तुमच्या लाभाच्या (अकराव्या) भावात वक्री होत आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे मार्ग वाढतील.
- आर्थिक बाजू मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
- नोकरीत प्रगती आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे.
- घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग येऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
- गुरु वक्रीमुळे तुमच्या नशिबाला साथ मिळेल.
- उच्च शिक्षण, विदेश प्रवास किंवा धार्मिक कार्यांसाठी हा काळ चांगला आहे.
- नोकरी-व्यवसायात यश आणि उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात.
- तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
- या राशीसाठी हा काळ आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो.
- तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि व्यवसायात स्थिरता येईल.
- मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
- समाजात मान-सन्मान वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
- तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- नोकरी-व्यवसायात प्रगतीचे मार्ग दिसतील.
- तुमची सामाजिक प्रतिमा आणि मान-सन्मान वाढेल.
- संबंधात सुधारणा होईल.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :




















