Guru Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, सर्व 12 राशींचा थेट संबंध हा नवग्रहांशी असतो. जेव्हा एखाद्या ग्रहाची चाल किंवा स्थिती बदलते तेव्हा त्याचा चांगला, वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. जेव्हा एखादा ग्रह उलटी चाल चालतो, तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर काही राशींचं भाग्य उजळतं. आता येत्या काळात गुरू (Jupiter) ग्रह उलटी चाल चालणार आहे, ज्यामुळे 3 राशींचा सुखाचा काळ सुरू होईल. 

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञानाचा कारक मानलं जातं. येत्या 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 1 मिनिटाने गुरू वृषभ राशीत उलट चाल चालेल, म्हणजेच तो वक्री होईल. 5 फेब्रुवारीपर्यंत गुरूचा याच अवस्थेत वृषभ राशीत मुक्काम असेल. हा काळ काही राशींसाठी भाग्याचा ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनेक सुखसोयींची प्राप्ती होईल, करिअर नवी उंची गाठेल. या राशी नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घेऊया.

9 ऑक्टोबरपासून सुखाचे दिवस सुरू

वृषभ रास (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री स्थिती फायदेशीर ठरू शकते. गुरू वक्री काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. करिअरच्या क्षेत्रात तुमचं लक्ष अधिक केंद्रित असेल. यासोबतच तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. वैयक्तिक प्रगतीसोबतच तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे तुम्ही नवीन चांगला व्यवसाय करू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रतिगामी स्थिती खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. गुरुचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. नोकरदार लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. 

धनु रास (Sagittarius)

गुरूची उलटी चाल धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याची ठरू शकते. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान झपाट्याने वाढेल. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आयुष्यातील दीर्घकाळ चाललेले व्याप आता संपुष्टात येतील. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे, तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन