Guru Transit 2026: माणसाच्या कर्मासोबत त्याच्या नशीबाचीही साथ लाभली, तर त्याला यशाची पायरी चढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.. ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाचे कर्म आणि नशीबामागे ग्रहांची स्थिती अवलंबून असते, ग्रहांची शुभ स्थिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडवते, तेच ग्रहांची अशुभ स्थिती अचानक होत्याचं नव्हतं करते. मात्र येणारा काळ काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रात, गुरू ज्ञान, दान, शिक्षण, धर्म, संपत्ती आणि वाढीचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत या ग्रहाची स्थिती मजबूत असते त्यांना जीवनात मोठे यश मिळते. हाच गुरू ग्रह तब्बल १२० दिवसांनी मार्गी होईल. त्यामुळे काही राशींना चांगला काळ अनुभवायला मिळेल. ते कोणत्या राशीचे आहेत ते जाणून घ्या.

Continues below advertisement

तब्बल 120 दिवसांनी गुरू ग्रह मार्गी होईल, 3 राशींना चांगले भाग्य देईल..

ज्योतिषींच्या मते, ज्या लोकांच्या कुंडलीत या ग्रहाची स्थिती मजबूत असते त्यांना जीवनात मोठे यश मिळते. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सामान्यतः चांगली असते. गुरू देवांचा गुरू आहे, म्हणूनच त्याला देवगुरू असेही म्हणतात. 11 मार्च 2026 रोजी गुरू मार्गी होणार आहे. गुरू मार्गी झाल्याने कोणत्या राशींना चांगला काळ अनुभवायला मिळेल ते जाणून घ्या.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूची मार्गी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. अडकलेला निधी परत मिळू शकेल. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. तुमचे बोलणे गोड होईल, जे कामाच्या ठिकाणी लोकांना प्रभावित करेल.

Continues below advertisement

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूची मार्गी चाल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. पगार वाढण्याचीही दाट शक्यता आहे. तुमच्या पालकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, 11 मार्चपासून मीन राशीचे नशीब उजळेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना चांगला नफा मिळेल. विविध मार्गांनी पैसे मिळू शकतात. पैशाची कमतरता भासणार नाही. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा

Numerology: 35 वयापर्यंत संघर्ष, नंतर लॉटरीच लॉटरी! 'या' जन्मतारखेच्या लोकांवर शनिदेवांची मोठी कृपा, परिस्थितीची जाण ठेवतात, अंकशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)