Guru Shukra Asta Effect 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वात आधी गुरु आणि शुक्राची (Jupiter-Venus Set) स्थिती पाहिली जाते. नक्षत्रात 9 ग्रहांपैकी हे दोन ग्रह महत्त्वाचे मानले जातात. बृहस्पति हा देवतांचा गुरू मानला जातो. तर शुक्र ग्रह हा राक्षसांचा गुरू आहे. आता या दोन्ही ग्रहांचा अस्त होतोय त्यामुळे काही राशींवर (Zodiac Signs) याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 


28 एप्रिलला शुक्र सकाळी 5:17 वाजता मेष राशीत अस्त झाला आणि 29 जून रोजी उदय होणार आहे. तसेच, गुरू 7 मे रोजी वृषभ राशीत अस्त झाला तर 6 जून रोजी उदय होणार आहे. दोन्ही शुभ ग्रहांच्या एकाच वेळी अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशांतता आली आहे. परंतु, या काळात काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.


मेष रास (Aries Horoscope)


ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीमध्ये, गुरु नवव्या आणि बाह्य भावाचा स्वामी आहे आणि शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. या राशीच्या पहिल्या घरात शुक्र तर दुसऱ्या घरात गुरू आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात या काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. परदेशी प्रवासाची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला अनावश्यक खर्च होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


शुक्र हा पाचव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. तर गुरू हा तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. या राशीमध्ये गुरु पाचव्या भावात तर शुक्र चौथ्या भावात अस्त झाला आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या काळात तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल. या काळात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. व्यावसायिक जीवन चांगले राहील. वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामाने प्रभावित होतील. त्याच वेळी, जर तुम्ही व्यवसाय भागीदारीत काम करत असाल तर काही अडचणी येऊ शकतात. गुरू ग्रहामुळे तुम्हाला लाभही मिळू शकतो. 


कन्या रास सूर्य चिन्ह (Virgo Horoscope)


या राशीच्या लोकांना गुरू आणि शुक्राच्या अस्तामुळे संमिश्र परिणाम मिळतील. तसेच, तुम्ही नवीन मित्र देखील बनवू शकता. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुमची मेहनत दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात लाभ होण्याची चिन्हे आहेत. या दोन ग्रहांच्या अस्तामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shukraditya Rajyog : तब्बल 10 वर्षांनंतर सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगाने जुळून येणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना येणार 'अच्छे दिन', होणार चौफेर लाभ