Guru Pushya Nakshatra 2025: हिंदू पंचांगमध्ये, पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ आणि लाभदायक नक्षत्र मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही, पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ आणि कल्याणकारी नक्षत्र मानले जाते. त्यात गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र महाशुभ मानले जाते. ज्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. पंचांगानुसार, आज 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरु पुष्य नक्षत्राचा एक अतिशय शुभ योग बनत आहे. या दिवशी काही खास वस्तू खरेदी करण्यासाठी हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. तसेच देवी लक्ष्मीचा सदैव घरात वास राहतो.

धन, समृद्धी आणि यशाचा स्रोत

ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे, परंतु या नक्षत्रावर गुरु बृहस्पति आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद देखील आहेत. म्हणूनच, गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र हे धन, समृद्धी आणि यशाचे स्रोत मानले जाते. गुरु पुष्य योगात कोणतेही शुभ कार्य सुरू करणे, तसेच आनंद आणि समृद्धी देणाऱ्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच, देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

गुरु पुष्य नक्षत्र शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ योग 20 आणि 21 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री 12:27 वाजता सुरू झाला आहे. 22 ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत म्हणजेच 12:08 मध्यरात्रीपर्यंत राहील. म्हणजेच गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ योग 21 ऑगस्ट रोजी दिवसभर राहील.

गुरु पुष्य नक्षत्रात काय खरेदी करणे शुभ आहे?

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्रात सोने-चांदी खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. याशिवाय वाहन, जमीन, घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासारख्या सुख-समृद्धी देणाऱ्या वस्तू खरेदी केल्या जातात. नवीन काम, व्यवसाय सुरू करण्यासाठी गुरु पुष्य योग खूप यशस्वी मानला जातो. यासोबतच गुरु पुष्य योगात गुंतवणूक केल्यानेही धनसंपत्ती वाढते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते आणि तिथे राहते.

गुरु पुष्य नक्षत्र इतके शुभ का आहे?

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मन आणि संपत्तीचा कारक ग्रह आहे. पुष्य नक्षत्राच्या दिवशी चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असल्याने, हा योग विशेषतः पवित्र आणि शुभ मानला जातो. 

हेही वाचा :           

Hartalika 2025: यंदाची हरतालिका 'या' 3 राशींचे भाग्य घेऊन येतेय! जबरदस्त नवपंचम राजयोगाचा योगायोग, बॅंक बॅलेंस वाढेल, पैसा कायमचा येणार..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)