Guru Pradosh Vrat 2024 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या व्रताचं पुण्य फळ दिवसानुसार प्राप्त होते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी गुरुवारी 18 जुलै रोजी होणार आहे. गुरुवारी हे व्रत असल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत म्हणतात. गुरु प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीच्या सुख आणि समृद्धीत चांगली वाढ होते. त्याचबरोबर शत्रूंचा नाश होतो. 


या व्रताला स्त्री आणि पुरुष दोघे करतात. धार्मिक मान्यतेनुसार, त्रयोदशी तिथीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी दुर्लभ ब्रम्ह योगाची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर अनेक शुभ योगांची निर्मिती होणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


गुरु प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त 


आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 18 जुलै रोजी संध्याकाळी 08 वाजून 44 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 19 जुलै रोजी संध्याकाळी 07 वाजून 41 मिनिटांनी होणार आहे. गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी 08 वाजून 44 मिनिटांपासून ते 09 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दरम्यान तुम्ही भगवान शिवची पूजा करू शकता. 


ब्रम्ह योग 


ज्योतिषीय मान्यतेनुसार, गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी दुर्लभ ब्रम्ह योगाची देखील निर्मिती होणार आहे. या योगाची निर्मिती सकाळी 06 वाजून 14 मिनिटांनी होणार आहे. तर, या व्रताचं समापन 19 जुलैला ब्रम्ह बेला मध्ये 04 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे. या योगात भगवान शिवाची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 


शिववास योग 


गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी शिववास योगाचा देखील दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. या दिवशी भगवान शिव कैलाश पर्वतावर विराजमान होतात अशी मान्यता आहे. त्यानंतर ते नंदीवर स्वार होतात. गुरु प्रदोष व्रत संध्याकाळी 08 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दरम्यान भगवान शिवची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात अशी मान्यता आहे. 


करण 


आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला बव, बालव आणि कौलव करण योग देखील जुळून येणार आहे. या शुभ योगात भगवान शिवची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं.  तसेच, या कालावधीत तुम्ही शुभ योगाची सुरुवात देखील करू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Surya Gochar 2024 : नवीन नोकरी, प्रमोशन, पगारातही चांगली वाढ! सूर्याच्या संक्रमणामुळे पुढचा एक महिना 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य