Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह समृद्धी, ज्ञान, आणि शिक्षणाचा कारक ग्रह मानला जातो. गुरु ग्रह जवळपास 13 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. नुकतंच गुरु ग्रह बृहस्पती 14 मे रोजी बुधच्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर हा ग्रह संक्रमण करणार आहे. यामुळे समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्या कामाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. 

या काळात तुमच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा ाकळ चांगला आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहांच्या संक्रमणाचा हा काळ फार लाभदायक असणार आहे. या राशीच्या भाग्य स्थानी हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. या काळात तुमच्या कोर्ट कचेरीच्या संदर्भातील अनेक वाद दूर होतील. तुमच्या साहसात चांगली वाढ झालेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक चांगले बदल घडून येतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. धार्मिक कार्यात तुमचं मन गुंतेल. अविवाहित लोकांसाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येतील. 

हेही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाचा आशीर्वाद, चौफेर होणार धनलाभ