Grah Gochar in January 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी (January 2026)महिन्याचा नवीन आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. नवीन आठवडा हा 12 ते 18 जानेवारीपर्यंत असणार आहे. या आठवड्यात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) उत्सव देखील आहे. त्यामुळे नवीन आठवडा फार खास असणार आहे. तसेच, नव्या आठवड्यात शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध ग्रहासारखे अनेक मोठमोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. हे सर्व ग्रह कर राशीत संक्रमण करणार आहेत. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs)लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा सुखकारक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांच्या हातात नवीन प्रोजेक्ट्स लागतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला भविष्यात अनेक संधी मिळतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील. त्यामुळे पैशांची देखील कमतरता भासणार नाही. पैशांच्या गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी उद्यापासून सुरु होणार आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नोकरदार वर्गातील लोकांच्या हातात नवीन प्रोजेक्ट लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा आणि मान-सन्मानाचा असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात काही महत्त्वाचे बदल दिसतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा सुख आणि समाधानाचा असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशीवर सकारात्मक परिणाम होईल. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
