Grah Gochar : 24 एप्रिलला होणार ग्रहांचं तांडव; 'या' 3 राशींचा सुरु होणार सर्वात वाईट काळ, शनीची साडेसाती लागणार?
Grah Gochar 2025 : ग्रहांमध्ये राहू ग्रहाला सर्वात पापी ग्रह मानलं जातं. राहू ग्रह सध्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात आहे. तसेच, न्यायदेवता शनीदेखील याच नक्षत्रात आहे.

Grah Gochar 2025 : वैदिक पंचांगानुसार, या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अनुकूल असणार आहे. याचाच अर्थ एप्रिल महिन्यात कोणतंच ग्रहण लागणार नाही. मात्र, या महिन्यात अनेक राशींच्या लोकांवर ग्रहांचं सावट असणार आहे. ग्रहांची ही स्थिती देशभरातही शुभ मानली जात नाहीये.
24 एप्रिलला होणार ग्रहांचं तांडव
ग्रहांमध्ये राहू ग्रहाला सर्वात पापी ग्रह मानलं जातं. राहू ग्रह सध्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात आहे. तसेच, न्यायदेवता शनीदेखील याच नक्षत्रात आहे. शनी आणि राहूचं एकाच नक्षत्रात असणं ज्योतिष शास्त्राच्या आधारे शुभ मानलं जात नाही.
24 एप्रिलच्या दिवशी एकादशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर वरुथिनी एकादशीचा उपवाससुद्धा या दिवशी ठेवला जातो. या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीत, शनी मीन राशीत आणि राहू ग्रह मीन राशीत असणार आहेत. राहू आणि शनीच्या मीन राशीत असल्याने पिशाच योग निर्माण झाला आहे. तर, नवग्रहांमध्ये शनी, राहू आणि मंगळ ग्रह सर्वात प्रभावशाली ग्रह मानतात. या तिन्ही ग्रहांची दृष्टी ज्या राशींच्या लोकांवर पडते त्या राशींसाठी हा काळ फार संकटाचा असतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी, मंगळ आणि राहू ग्रहामुळे सध्या या राशीच्या लोकांना चांगले दिवस लाभणार नाहीत. या कालावधीत तुमच्या कामावर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, या काळात कोणतंही काम मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न करा.
सिंह रास (Leo Horoscope)
या काळात तुमच्यात आणि जोडीदारामध्ये गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे या काळात तुमच्या पार्टनरपासून कोणतीच गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करु नका. तसेच, कोणाला पैसे उधारी देऊ नका. गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी, मंगळ आणि राहूसारख्या ग्रहांचं तांडव असणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तसेच, तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीतही कोणती सुधारणा जाणवणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















