Gold Astrology : सोने (gold) प्रत्येकाला आकर्षित करते, परंतु ते परिधान करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, कारण काही राशींसाठी सोने परिधान करणे चांगले मानले जात नाही. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय..

 

ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?सोन्याचे अलंकार हे प्रत्येकालाच आकर्षित करतात, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक लोकांसाठी, सोने परिधान करणे फायदेशीर नसते, असे मानले जाते की, काहीवेळा लोकांना सोने परिधान केल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, तर काहीवेळा सोने धारण केल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ ठरू शकते.  जाणून घ्या अशा कोणत्या राशी आहेत? ज्यांना सोने धारण केल्यामुळे काहींना नुकसान सहन करावे लागते, त्यांच्यासोबत अशी काही घटना घडते, ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

वृषभवृषभ राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे किंवा बाळगणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की जेव्हा लोक या राशीसाठी सोने घालतात तेव्हा त्यांना काही प्रकारचे नुकसान किंवा अडचणीचा सामना करावा लागतो.

मिथुनमिथुन राशीच्या लोकांसाठी सोने चांगले नाही, सोने धारण केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यांना सोने खरेदी किंवा परिधान करून फायदा होत नाही.

कन्याकन्या राशीच्या लोकांनी चुकूनही सोने घालू नये. अनेक वेळा कन्या राशीच्या लोकांना सोने परिधान केल्यामुळे आयुष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचते.

कुंभकुंभ राशीच्या लोकांना सोने धारण केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे ते नाराजही होऊ शकतात. त्यामुळे सोन्याचे दागिने न घालणे योग्य ठरेल.

या कारणांमुळे सोने परिधान करणे अशुभ

सोन्यामुळे ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण होतात, ज्यामुळे विषाचे परिणाम नष्ट होतात. सोने जर फायदेशीर असेल तर ते व्यक्तीचे आयुष्य समृद्ध करते, परंतु जर ते नुकसान करत असेल तर ते तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. केवळ छंदासाठी नव्हे तर आपल्या गरजेनुसार सोने परिधान केले पाहिजे. जर तुमच्या कुंडलीत गुरूची स्थिती खराब असेल तर तुम्ही सोने घालू नये.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope 11 September to 17 September 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या