Gemini Horoscope Today 26 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरदार (Empoyees) लोकांना नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांनाही आपल्या आवडीची नोकरी करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील (Family) सर्व सदस्य एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. आज तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. दैनंदिन व्यवहारात (Business) बदल करण्याची गरज आहे. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. व्यवसायात प्रगती होईल, पदोन्नतीचा मार्ग खुला होईल. तुमची जी कामे खूप दिवसांपासून रखडलेली होती, ती आज पूर्ण होतील. राजकारणाशी (Politics) संबंधित लोकांना यश मिळेल.
मिथुन राशीतील व्यापारी, नोकरी व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या वेळी, व्यवसायात ग्राहकांच्या पुढाकारामुळे विक्रीत चांगली वाढ होईल. सरकारी कामात गुंतलेल्या व्यावसायिकांना लाभ होताना दिसतील. कोणतीही ऑर्डर मिळविण्यात तुम्हाला यश मिळू शकते. नशिबाच्या पाठिंब्याने सर्व सरकारी आणि बँकेशी संबंधित कामे लवकर पूर्ण होतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांना बॉसशी चांगल्या संबंधांचा लाभ मिळेल.
मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात समृद्धी राहील. घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढताना दिसेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कामे पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल.
मिथुन राशीच्या लोकांचे आजचे आरोग्य
मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु काम आणि व्यवसायाशी संबंधित मानसिक तणाव राहील. ध्यान आणि योगाभ्यास करत राहणे फायदेशीर ठरेल.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवीची सेवा करा. तसेच पांढऱ्या वस्तू दान करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :