Gemini Horoscope Today 16 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज घरातील अनेक दिवसांपासून थांबलेली कामे तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. राजकारणात (Politics) यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) तुम्हाला फायदा होईल. आज व्यवसायात (Business) डीलच्या नवीन ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. आधी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ आज तुम्हाला मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे.

Continues below advertisement


छोट्या व्यावसायिकांनाही भरीव लाभ मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, हा प्रवास तुमच्यासाठी सुखद असेल. वैवाहिक जीवनात (Married Life) आनंद कायम राहील. तुमच्या जोडीदारासाठी (Life Partner) तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. भाऊ-बहिणीतील कलह संपुष्टात येईल. 


मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक असेल. पण काही गोंधळामुळे मन विचलित होईल. नोकरीत तुम्हाला कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. नियोजन करून काम करा. सहकाऱ्यांचे बोलणे आणि वागणे यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात आज चढ-उतारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. राजकारणातही चांगली संधी आहे.


मिथुन राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन


कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. लहान भावंडांचेही सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी कुटुंबियांबरोबर एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट द्या. प्रसन्न वाटेल.


मिथुन राशीसाठी आजचे आरोग्य 


आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना शरीरात थकवा जाणवेल. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. जोखमीचे काम टाळा, दुखापत होऊ शकते.


मिथुन राशीसाठी आजचे उपाय


सरस्वती देवीची पूजा करा. गरिबांना अन्नदान करा.


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य