Gemini Horoscope Today 04 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे (Friends) पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. घरगुती जीवनात (Married Life) सुख शांती राहील. सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज कामाच्या ठिकाणी तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण करा. वरिष्ठांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुम्ही थोडेसे बेचैन व्हाल. राजकारणात (Politics) चांगली संधी आहे.
मिथुन राशीच्या लोकांनी आज आपल्या बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही कोणतीही मालमत्ता वगैरे खरेदी करणार असाल तर या बाबतीत दिवस तुमचा अनुकूल राहील. आज तुम्ही मालमत्ता खरेदी करणार असाल तर सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. नोकरी व्यवसायात कर्मचारी आणि बॉस यांच्यात उत्तम समन्वय दिसून येईल.
आज धनलाभ होण्याची शक्यता
तुम्ही विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची राहील. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणातही आज चांगली संधी आहे. अनेक नेत्यांच्या भेटी होतील. आज तुमचे बऱ्याच काळापासून सुरू असलेलं कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.
मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही धार्मिक चर्चेत सहभागी देखील होऊ शकता. अचानक पाहुणे घरी आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो, पण पाहुणे आल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. संध्याकाळी एखाद्या शुभ समारंभास उपस्थित राहण्यास मिळेल.
आज मिथुन राशीचे तुमचे आरोग्य
आरोग्य चांगले राहील, परंतु दिवसभर धावपळ केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य