Geeta Gyan : श्रीमद्भागवत गीतेत (Bhagvad Geeta) भगवान श्रीकृष्णाच्या (Lord Shri Krishna) शिकवणुकीचे वर्णन करते. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील (Mahabharat) युद्धात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे. ही माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता असा एकमेव धर्मग्रंथ आहे. जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद् भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. 


अशा भक्तांचे रक्षण भगवंतच करतात


असे म्हटले जाते की, गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद्भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते. गीतेत लिहिले आहे की, ज्याच्या मनात फक्त भगवंतच वास करत असतो आणि प्रत्येक क्षण भगवंताचा विचार करण्यात मग्न असतो, त्याला खरा भक्त म्हणतात. सतत भगवंताशी जोडलेल्या अशा भक्तांचे रक्षण भगवंतच करतात.



कोणी तुमच्या सोबत असो वा नसो, पण.......... 


श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की, जेव्हा कधी हिंमत तुटते तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणी तुमच्या सोबत असो वा नसो, पण देव तुमच्या सोबत आहे आणि सदैव राहील.


गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, समस्या कितीही मोठी असली तरी ती दोन गोष्टींनी सोडवली जाऊ शकते. रागाच्या वेळी थोडं थांबा आणि चुकल्यावर थोडं नतमस्तक व्हावं, मग जगातले
सर्व प्रश्न सुटतील.


गीतेत श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांनाही त्रास होईल आणि जर तुम्ही भाग्यवान असाल तर, देव तुम्हालाही हे पाहण्याची संधी देईल.


गीतेत लिहिले आहे की, जेव्हा माणसाची गरज बदलते, तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते.


श्रीमद्भगवद्गीतेनुसार तुम्ही भूतकाळात जाऊ शकत नाही किंवा सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करून शेवट बदलू शकता.


देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती आपले नशीब लिहितात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता