Geeta Gyan: पुराणातील पवित्र हिंदू ग्रंथांपैकी एक म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. गीता केवला एक ग्रंथ नसून, संपूर्ण आयुष्याचं सार आहे. व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसं जगावं आणि कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्यात हे सांगणारा आणि अधर्माचा त्याग करून धर्माच्या वाटेवर चालायला शिकवणारा हा ग्रंथ आहे. महाभारताचं युद्ध सुरु असताना श्रीकृष्णाने अजुर्नाला दिलेलं हे महत्त्वाचं ज्ञान या ग्रंथातून आजही व्यक्तीला आदर्श जीवनाचं महत्त्व सांगतं. या ग्रंथात सांगितलेली शिकवण आजही माणसाच्या कामी येणारी आहे.


गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धक्षेत्रात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, परिस्थिती कितीही वाईट असली, तरी ती नेहमी सारखी नसतात. प्रत्येक परीस्थितीत बदल हा होतोच.


श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण


* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.


* गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.


* श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.


* कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.


* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.


 * श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या