Gauri Pujan 2025 : सध्या गणेशोत्सवाचं (Ganeshotsav) सगळीकडे वातावरण आहे. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे गणपतीच्या आगमनाची उत्सुकता असते तशीच उत्सुकता गौराईच्या आगमनाची असते. त्यानुसार आज म्हणजेच 31 ऑगस्ट 2025 रोजी घरोघरी गौराईंचं आगमन होणार आहे. या दरम्यान ज्येष्ठा गौरी पूजेसाठी तुम्ही काही खास उपाय करु शकता. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

धन आणि समृद्धीसाठी

  • गौराईच्या पूजेच्या वेळी गौरीसमोर तांदळाचा ढीग करून त्यावर एक रुपया किंवा नाणे ठेवावे. पूजनानंतर ते नाणे तिजोरीत ठेवले की घरात पैसा टिकतो.
  • हळद-कुंकवाने सजवलेली सुपारी गौरीसमोर ठेवावी आणि विसर्जनानंतर घरातच धनस्थानात ठेवावी. हे लक्ष्मीप्राप्तीचे प्रतीक आहे.

सौभाग्यासाठी (स्त्रियांसाठी)

  • गौरीला साड्या, हिरवे कांचन, फुले, सोन्याचे दागिने अर्पण केल्यास स्त्रियांचे सौभाग्य टिकते.
  • विवाहित स्त्रियांनी गौरीला हळद-कुंकू लावून 16 स्त्रियांना ओटी (साड्या, हिरवे बांगड्या, कुमकुम, वस्त्र) द्यावे. यामुळे अखंड सौभाग्य लाभते.

आरोग्यासाठी

  • गौरी पूजनात तुळशीची पाने, दूर्वा आणि हळद नक्की अर्पण करावीत. यामुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते.
  • गौरीच्या मूर्तीजवळ दूध व केशर अर्पण करावे. हे दीर्घायुष्य व आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

घरातील शांतीसाठी

  • गौरी पूजेच्या दिवशी दिवसभर घरात दीपक लावावा. यामुळे वाद-विवाद कमी होतात.
  • गौरीला पानावर साखरेचे पेढे, मोदक व गोड धान्य अर्पण करावे. हे घरात गोडवा आणते.

गुप्त पण प्रभावी उपाय

  • गौरी विसर्जनाला जाताना, त्यांच्या ओटीत ठेवलेले तांदूळ व हळद घरभर शिंपडल्यास वाईट शक्ती दूर होतात.
  • विसर्जनाच्या वेळी गौरीच्या पूजेत वापरलेला पाणी व फुलांचा तुरा घराच्या मुख्य दरवाजावर ठेवावा त्यामुळे घरात नेहमी मंगल राहते.
  • हे उपाय केल्याने धन, सौभाग्य, आरोग्य आणि घरातील सुख-शांती लाभते असे मानले जाते.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :                                                                                                     

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? लॉटरी लागणार? साप्ताहिक राशीभविष्य