Garuda Purana : गरुड पुराण हे सनातन धर्माचे एक महान शास्त्र मानले जाते. असे म्हटले जाते की, गरूड पुराण हे सर्व गूढ गोष्टींच्या बाबतीत मार्गदर्शन करते. भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे प्रमुख देवता आहेत. भगवान विष्णू आपले वाहन पक्ष्यांचा राजा गरुड याच्याशी आचार, नियम आणि कर्म याविषयी ज्या गोष्टी बोलतात त्या गरुड पुराणात सांगितल्या आहेत. यासोबतच मृत्यू आणि मृत्यूनंतरची स्थिती व कर्मानुसार मिळणाऱ्या फळाबाबतही यात सांगितले आहे.


धार्मिक शास्त्रानुसार, गरुड हा कश्यप ऋषींचा पुत्र आहे. त्याला भगवान विष्णूचे वाहन बनण्याचा मान प्राप्त झाला आहे. एकदा पक्ष्यांचा राजा गरुडाने भगवान श्रीनारायण यांना मानवाने केलेल्या अशा कार्यांबद्दल विचारले, ज्यामुळे त्याचे सौभाग्य, आरोग्य, ज्ञान आणि संपत्ती नष्ट होते.


या कारणांमुळे नशीब, आरोग्य, ज्ञान आणि पैसा नष्ट होऊ शकतो


हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला सुख, सौभाग्य आणि संपत्तीची दाता मानली जाते. असे म्हटले जाते की, माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. ज्या घरात या गोष्टीची विशेष काळजी घेतली जाते तिथे माता लक्ष्मी वास करते. असे लोक जे घाणेरडे कपडे घालतात, घर साफ करत नाहीत, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवतात, मुख्य दरवाजा साफ करत नाहीत, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहात नाही. त्यामुले अस्वच्छ राहणाऱ्या लोकांचे सर्व सौभाग्य आणि वैभव हळूहळू नष्ट होते.


ज्ञान आणि शिक्षण अशा गोष्टी आहेत, ज्याचा वेळोवेळी अभ्यास केला पाहिजे. यात माणूस कितीही कुशल असला तरी यापासून माणूस दूर गेला तर तो ज्ञान विसरतो. ज्ञान मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. शिवाय त्यासाठी खूप कष्ट करावे लागते. त्यामुळेच वेळोवेळी कठोर परिश्रम आणि दीर्घकाळानंतर मिळालेल्या ज्ञानाचा योग्य पावर करा व सतत त्याची उजळणी करा. असे केले नाही तर अशा लोकांकडून त्यांचे ज्ञानही नष्ट होते असे म्हटले जाते.


आरोग्य ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुले त्याची विशेष काळजी घ्या. गरुड पुराणात शुद्ध, पचण्याजोगे आणि शाकाहारी अन्नाचे स्पष्टीकरण दिले आहे. धार्मिक दृष्टीकोनातूनही असे अन्न शुद्ध मानले जाते आणि त्यामुळे शारीरिक त्रास होत नाही. शिवाय मांसाहारी, भरपूर आणि स्निग्ध पदार्थ खाल्ल्याने माणूस लवकर आजारांच्या कचाट्यात सापडतो.


प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असते. पण तुमच्या काही सवयींमुळे मिळालेला पैसाही वाया जाऊ शकतो. गरुड पुराणानुसार, जे लोक दान करत नाहीत, रात्री जेवलेली भांडी न धुता ती कशीच ठेवली जातात, कोणत्याही गोष्टीचा कर्व करतात, संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात, अशा लोकांना धन कमावल्यानंतर देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)