Garud Puran : गरुड पुराण घरात ठेवावं की ठेवू नये? कधी वाचावं गरुड पुराण? वाचा या ग्रंथाशी संबंधित महत्त्वाचे नियम...
Garud Puran : गरुड पुराणात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्य सांगण्यात आले आहेत. तसेच, या ग्रंथात जीवन, मृत्यू, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म आणि मोक्षशी संबंधित अनेक रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Garud Puran : हिंदू धर्मग्रंथानुसार, गरुड पुराणाला (Garud Puran) एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा ग्रंथ मानण्यात आला आहे. हा ग्रंथ भगवान विष्णूला समर्पित आहे. तसेच, या ग्रंथात जीवन, मृत्यू, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म आणि मोक्षशी संबंधित अनेक रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर, धर्म, पूजा-पाठ, नीती आणि जीवनातील नियमांचं देखील विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळेच, या ग्रंथाशी संबंधित अनेकांच्या मनात कुतूहल असतं की गरुड पुराण नेमकं कधी वाचावं आणि हे घरात ठेवू शकतो की नाही?
गरुड पुराणाचं महत्त्व
गरुड पुराणात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्य सांगण्यात आले आहेत. यामध्ये जन्म, मृत्यू, स्वर्ग, नरक आणि आत्म्याच्या प्रवासाचं वर्ण करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त यामध्ये धर्म, उपवास आणि आयुष्य योग्य पद्धतीने कसं जगावं याच्या नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे.
कधी वाचावं गरुड पुराण?
धार्मिक मान्यतेनुसार, गरुड पुराणाचं पठण सहसा घरातील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केला जातो. असं म्हणतात, मृत आत्मा 13 दिवसांपर्यंत आपल्या घराच्या आसपासच असते. या दरम्यान गरुड पुराण ऐकल्याने आत्म्याला मोक्षाचा मार्ग मिळतो. त्यामुळेच याचं पठण मृत्यूच्या नंतरच करतात.
गरुड पुराणाशी संबंधित नियम
गरुड पुराण अन्य पुराणापेक्षा वेगळं मानलं जातं. त्यामुळेच, याच्या पठणाशी संबंधित विशेष नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गरुड पुराणाचं पठण शोकात मृत व्यक्तीच्या घरात केलं जातं. यावेळी घरातील सदस्य सुद्धा गरुड पुराण ऐकतात.
गरुड पुराण घरी ठेवू शकतो का?
अनेकदा लोकांमध्ये असा भ्रम आहे की, गरुड पुराण घरात ठेवू नये. कारण हा ग्रंथ व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित आहे. मात्र, हा गैरसमज चुकीचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गरुड पुराण हा मोक्ष आणि ज्ञानाचा ग्रंथ आहे. गरुड पुराण घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच, घरातील सकारात्मकता वाढते. यामुळे ते घरात ठेवणं वर्जित नाही मानलं जात.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी



















