Garud Puran: हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणात आढळते. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे पुराण श्रवण करण्याची प्रथा आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की, माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ मिळते, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळते. त्यामुळे कर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराण सांगितल्याने मृत व्यक्तीला जन्म-मृत्यूशी संबंधित सर्व सत्याचे ज्ञान होते. मृत्यूनंतर मानवी आत्म्याचे काय होते? त्या आत्म्याचा खरोखर पुनर्जन्म होतो का? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर गरुड पुराणातून जाणून घेणार आहोत.
मृत व्यक्तीचा आत्मा 13 दिवस घराभोवती फिरतो?
गरुड पुराणानुसार मनुष्याला त्याच्या कर्माच्या फळानुसार स्वर्ग किंवा नरक सुख मिळते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 13 व्या दिवशी पिंड दान केले जाते. असे मानले जाते की मृत व्यक्तीचा आत्मा 13 दिवस घराभोवती फिरतो. गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा दीर्घकाळ प्रवासाला जातो. गरुड पुराणानुसार यमदूत आधी आत्म्याला यमलोकात घेऊन जातो. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कर्माचा हिशोब यमराजांसमोर ठेवला जातो.
एखाद्या व्यक्तीचे वाईट कर्म असेल तर...
असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे वाईट कर्म असेल तर यमराज तुमच्या आत्म्याला शिक्षा देतात. आणि त्यांना नरकातही पाठवतात. जीवंत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चांगले कार्य असते, तेव्हा तुमचा आत्मा स्वर्गात नेला जातो. गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याला यमराजापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर मानवी आत्मा त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघतो. हा खूप लांबचा प्रवास आहे आणि या दरम्यान त्याला अनेक टप्पे पार करावे लागतात.
एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म किती दिवसांनी होतो?
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो मृत्यूच्या 3 ते 40 दिवसांच्या आत पुन्हा जन्म घेतो. गरुण पुराणानुसार व्यक्तीचा पुनर्जन्म त्याच्या कर्माच्या आधारे होतो. जर एखाद्याने पाप केले तर त्याचा आत्मा नरकात पाठविला जातो आणि जर मनुष्याने पुण्य कर्म केले तर त्याचा आत्मा स्वर्गात पाठविला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते. तरच त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. माणसाचा पुढील जन्म त्याच्या कर्माच्या आधारे ठरतो.
पिंड दान महत्त्वाचे..
गरुड पुराणानुसार,पिंड दान हे मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. आत्म्याला त्याचा अर्धा भाग मिळतो, ज्यामुळे त्याचा प्रवास सुकर होतो. त्याचबरोबर वाईट कर्म करणाऱ्याला यमदूत पिंडदान देत नाही आणि त्याला उपाशीपोटी प्रवास करावा लागतो.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो? गरुड पुराणात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )