Ganesh Visarjan 2026: आज अनंत चतुर्दशी...आज 25 सप्टेंबर रोजी गणेशोत्सावाची सांगता होणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची विधीवत पूजा करतात. त्यानंतर ते गणपतीला नैवेद्य दाखवतात, आरती करतात आणि मग मूर्तीचे विसर्जन करतात. काही कुटुंबांमध्ये, गणेश विसर्जन दीड दिवस, पाचव्या किंवा सातव्या दिवशी केले जाते. तर मंदिर आणि मंडपांमध्ये स्थापित गणेश मूर्तींचे विसर्जन सहसा अनंत चतुर्दशीला केले जाते. अनंत चतुर्दशी हा गणेश विसर्जनासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो यावर्षी 25 सप्टेंबर रोजी आहे. आज आपण गणेश विसर्जनाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन कधी कराल? तिथी, शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan 2026)
चतुर्दशी तिथी सुरूवात - 24 सप्टेंबर 2026 रात्री 11:18 वाजताचतुर्दशी तिथी समाप्ती - 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:06 वाजतायंदा, पंचांगानुसार, आज 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी बाप्पााच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येते.
बाप्पाच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त
- पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी - 6:28 ते 10:59 शुभ चौघडिया
- दुपारी - 12:30 ते 2:01 पर्यंत शुभ चौघडिया
- सायंकाळी - 5:02 ते 6:32 पर्यंत शुभ चौघडिया.
- रात्री - 9:31 ते 11:01 पर्यंत शुभ चौघडिया..
विसर्जनापूर्वी भगवान गणेशाची पूजा पद्धत
स्नान, स्वच्छता - पूजा करण्यापूर्वी घरातील सर्वांनी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेची जागा स्वच्छ करावी.
गणपतीसमोर दिवा लावावा - अगरबत्ती/धूप लावून बाप्पांना नमस्कार करावा.
संकल्प आणि प्रार्थना - मनात बाप्पांना नमस्कार करून, “हे गणराया, आमच्याकडून झालेल्या पूजा-अर्चेतील चुका क्षमा कराव्यात आणि आपल्या कृपेने आमच्या परिवारावर सुख-समृद्धी राहू द्यावी,” अशी प्रार्थना करावी.
बाप्पांना नैवेद्य दाखवावा - मोदक, फळे, पेढे किंवा घरचा आवडीचा नैवेद्य अर्पण करावा.
फुले, दुर्वा आणि अक्षता अर्पण कराव्यात - गणपतीला फुले आणि दुर्वा वाहून अक्षता अर्पण कराव्यात.
आरती करावी - कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे गणपतीची आरती करावी.
उत्तरपूजा करावी - गणपतीला नमस्कार करून, पूजा स्वीकारल्याबद्दल आणि आपल्या घरी येऊन आनंद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. “गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या,” अशी प्रार्थना करावी.
विसर्जनासाठी बाप्पांना निरोप - बाप्पाची मूर्ती अलगद उचलून फुलांनी सजवलेल्या ताटात/पाटावर ठेवावी. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने औक्षण करून बाप्पांना निरोप देऊ शकतो.
जयघोष करत विसर्जनस्थळी जावे - “गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!”
गणेश विसर्जन कसे करतात?
बाप्पाचे विसर्जन पद्धत परंपरेनुसार साध्या पद्धतीने अशी करता येते:
विसर्जनापूर्वी पूजा - गणपती बाप्पाला नैवेद्य, फुले, दुर्वा आणि आरती अर्पण करा.उत्तरपूजा करा - बाप्पाला मनोभावे नमस्कार करून, पूजेतील चूक झाली असल्यास क्षमा मागा.नैवेद्य, प्रसाद - कुटुंबातील सर्वांनी प्रसाद घ्यावा.बाप्पाची मूर्ती अलगद उचला - मूर्तीला धक्का लागू नये याची काळजी घ्या.विसर्जनासाठी जाताना जयघोष - “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”शक्य असल्यास नैसर्गिक किंवा कृत्रिम विसर्जन कुंडाचा वापर करा - स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.मूर्ती पाण्यात हळुवारपणे विसर्जित करा - घाई किंवा धक्काबुक्की टाळा.निर्माल्य वेगळे जमा करा - फुले, हार इत्यादी नदी/तलावात न टाकता निर्माल्य कलशात द्यावे.
हेही वाचा :
Hindu Religion: सूर्यास्तानंतर घरातील केर का काढला जात नाही? सायंकाळी केर काढावा लागला तर? गरुडपुराणातील रहस्य, धार्मिक मान्यता कमी लोकांना माहित...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
