Ganesh Chaturthi 2026: हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा 25 सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन केले जाणार आहे. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची विधीवत पूजा करतात. त्यानंतर ते गणपतीला नैवेद्य दाखवतात, आरती करतात आणि मग मूर्तीचे विसर्जन करतात. काही कुटुंबांमध्ये, गणेश विसर्जन दीड दिवस, पाचव्या किंवा सातव्या दिवशी केले जाते. तर मंदिर आणि मंडपांमध्ये स्थापित गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. आज आपण वैदिक पंचांगानुसार गणेश विसर्जनाचे शुभ मुहूर्त, अचूक तारीख आणि महत्त्व जाणून घेऊया. 

Continues below advertisement

गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) कधी आहे? अचूक तिथी, मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या..(Anant Chaturdashi 2026)

चतुर्दशी तिथी सुरूवात - 24 सप्टेंबर 2026 रात्री 11:18 वाजताचतुर्दशी तिथी समाप्ती - 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:06 वाजतायंदा, पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस मानला जातो.याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने केले जाते

बाप्पाच्या विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त

  • पंचांगानुसार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6:28 ते 10:59 शुभ मुहूर्त
  • दुपारी 12:30 ते 2:01 शुभ मुहूर्त.
  • सायंकाळी 5:02 ते 6:32 शुभ मुहूर्त
  • रात्री 9:31 ते 11:01 शुभ मुहूर्त

गणेश विसर्जन कसे केले जाते?

  • गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी, गणपतीची पूजा केली जाते,
  • त्यानंतर बाप्पाची आरती केली जाते, फुले अर्पण केली जातात आणि नैवेद्य दाखवला जातो.
  • यानंतर, मोठ्या थाटामाटात आणि ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते.
  • मग, "गणपती बाप्पा मोरया" आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो.
  • गणेश विसर्जन सोहळा सहसा रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालतो.

घरच्या घरी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन कसे करतात?

बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन घरीसुद्धा करता येते. यासाठी तुम्हाला एका स्वच्छ, मोठ्या टब किंवा भांड्याची आवश्यकता असेल. भांड्यात पाणी भरा आणि त्यात थोडे गंगाजल घाला. मग, त्यात फुले घाला. यानंतर, पूर्ण भक्तीभावाने गणपतीच्या मूर्तीचे या पाण्यात विसर्जन करा. आजकाल बहुतेक भक्त गणपती बाप्पाचे विसर्जन अशा प्रकारे करतात. मंडप आणि मंदिरांमध्ये स्थापित केलेल्या बाप्पाच्या भव्य मूर्तींचे विसर्जन नदी किंवा तलावात केले जाते.

Continues below advertisement

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2027: गणेशभक्तांसाठी खुशखबर..पुढच्या वर्षी गणेशोत्सव 10 दिवस लवकर! पुढच्या 11 वर्षांपर्यंत आगामी सर्व तारखा, पंचांगकर्ते सांगतात..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)