Ganesh Chaturthi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, लवकरच राज्यात गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi) सुरुवात होणार आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात बाप्पाची मनोभावे तर पूजा केली जातेच पण त्याचबरोबर गणरायाला खास नैवेद्य देखील दाखवला जातो. या नैवेद्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. यासाठीच गणपतीची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे. 


गणरायाला मोदक प्रिय आहे हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण या व्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाप्पाला खूप आवडतात. मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता, यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.  


मोतीचूर लाडू :


गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात. असं मानलं जातं की, मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पााच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.


खीर :


तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


मोदक :


गणपतीला मोदक आवडतात हे सर्वांनाच माहित आहे. एकदा युद्धात गणेशजींचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं. त्यानंतर आई पार्वतीने त्याच्यासाठी मोदक बनवले. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत. असं म्हटलं जातं की, बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.


छप्पन भोग :


गणरायाला तुम्ही 56 भोगदेखील अर्पण करु शकता. यामध्ये 56 विविध प्रकारची मिठाई असावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कोणताही नैवेद्य बनवू शकता. या दिवशी गणपतीला शुद्ध आणि सात्विक भोजनाचा विशेष नैवेद्य अर्पण केला जातो.


केळीचा नैवेद्य :


कोणत्याही पूजेत सर्व देवी-देवतांना केळी अर्पण केली जातात. गणपतीला केळी खूप आवडतात अशी मान्यता आहे. केळी अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.


गणपतीला नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप करा


बाप्पाला नैवेद्य दाखवताना मंत्राचा जप केल्याने बाप्पा नैवेद्य लवकर स्वीकारतात.


त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या गणरायाच्या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व