Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने राज्यासह सध्या देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सार्वजनिक ठिकाणी, बाजारात बाप्पाच्या आगमनाची तयारी पाहायला मिळतेय. पण, गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2025) उत्सव नेमका का साजरा केला जातो? गणेश चतुर्थीचं महत्त्व नेमकं काय? आणि बाप्पाच्या आगमनाची शुभ वेळ कोणती? या संदर्भात तुम्हाला माहित आहे का? नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

Continues below advertisement


गणेश चतुर्थीचे महत्त्व 2025 (Ganesh Chaturthi Importance 2025)


गणराया, ज्यांना बुद्धीचे दाता आणि विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यांना गजानन आणि लंबोदर अशा नावांनीही ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची  पूजा करणं शुभ मानलं जातं. गणेश चतुर्थी या वर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो आणि 10 दिवस चालतो, जो अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने समाप्त होतो. मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भक्त गाजे-बाजांसह नाचत-गात, गुलाल उडवत मिरवणूक काढतात आणि पूर्ण भक्तीभावाने पवित्र नद्या आणि तलावांमध्ये गणरायाचे विसर्जन करतात.


गणेश चतुर्थी 2025 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurta)


26 ऑगस्ट 2025 (26 August 2025), मंगळवार चतुर्थी तिथी प्रारंभ दुपारी 1:54 वा. 
27 ऑगस्ट 2025 (27 August 2025), बुधवार गणेश चतुर्थी संपूर्ण दिवस
27 ऑगस्ट 2025 (27 August 2025), बुधवार गणेश चतुर्थी पूजेची वेळ सकाळी 11:05 वा. 
27 ऑगस्ट 2025 (27 August 2025), बुधवार चतुर्थी तिथी समाप्त संध्याकाळी 01.40 वा. 
6 सप्टेंबर 2025 (6 September 2025), शनिवार गणेश विसर्जन संपूर्ण दिवस


1. गणेश चतुर्थी 2025 कधी आहे?


(When is Ganesh Chaturthi 2025?)



पंचांगानुसार, गणेश चतुर्थी हा सण 27 ऑगस्ट 2025 रोजी आहे.


2. 2025 मध्ये गणपती स्थापना कधी आहे?



(When is Ganpati Sthapana in 2025?)



हिंदू पंचांगानुसार, वर्ष 2025 मध्ये, गणेश चतुर्थीचा उत्सव 27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होईल. ज्याची सांगता 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेश विसर्जनाने होईल.


3. गणपती 3 दिवस ठेवता येतो का?



(Can Ganesha be kept for 3 days?)



कौटुंबिक परंपरेनुसार गणराया 1.5 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, 10 दिवस किंवा कायमस्वरूपी ठेवू शकतात.


4. गणेश चतुर्थीला चंद्र दिसल्यास काय होते?



(What happens if the moon is visible on Ganesh Chaturthi?)



गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते.


5. गणेश आगमनाची सर्वोत्तम वेळ कोणती?



(What is the best time for Ganesh's arrival?)



सकाळी 11.05 ते दुपारी 01.40 ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. याच काळात गणेशाचा जन्म झाला. मात्र दुपारी फक्त गणपतीची स्थापना करून पूजा करणे शुभ मानले जाते.


6. श्रीगणेशाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा?



(Which mantra should be chanted while worshipping Lord Ganesha?)



ऊँ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्॥


7. श्रीगणेशाला कोणते फळ अर्पण केले जाते?



(Which fruit is offered to Lord Ganesha?)



गणेशजींना सीताफळ आवडते, म्हणून ते पूजेत अर्पण केले जाऊ शकते.


8. श्रीगणेशाचे मुख कोणत्या दिशेला असावे?



(In which direction should Lord Ganesha face?)



श्रीगणेशाला अनेकदा घराच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून ठेवावे. वास्तूनुसार, यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि समृद्धी येते.


9. श्रीगणेशाची सोंड कोणत्या दिशेला असावी?



(In which direction should the trunk of Lord Ganesha be facing?)



श्रीगणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी.


हे ही वाचा :


Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या गणरायाच्या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व