Ganesh Chaturthi 2025 : हिंदू धर्मात गणपतीला प्रथन पूजनीय मानतात. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी बाप्पाची (Ganesh Chaturthi) पूजा करतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं. यासाठीच घर असो किंवा ऑफिस प्रत्येक ठिकाणी गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावतात. जेणेकरुन सर्व संकटांपासून मुक्ती मिळावी.
मान्यतेनुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा पूजेच्या स्थानी गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण, गणेश मूर्तीच्या संदर्भात तुम्हाला काही वास्तू नियम माहीत आहेत का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
गणपतीच्या मूर्ती संदर्भातील काही वास्तू नियम (Vastu Tips For Ganesh Chaturthi)
गणपतीची मूर्ती घरी ठेवण्याआधी ती मूर्ती कशी असावी आणि कोणत्या दिशेला असावी या संदर्भातील वास्तू नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. वास्तूशास्त्रानुसार, मूर्ती योग्य दिशेला असेल तर घरात सुख-समृद्धी येते. तर, चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात वाद, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी येतात.
'या' ठिकाणी गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका
(Do not place the idol of Ganesha in this place by mistake)
- घराच्या किंवा ऑफिसच्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि फोटो लावणं अशुभ मानलं जातं.
- बेडरुममध्ये गणपतीची पूजा केल्याने पती-पत्नीच्या नात्यात अनावश्यक वाद वाढू शकतात.
- तसेच, गणपतीची मूर्ती नेहमी स्वच्छ ठिकाणीच ठेवा. अंधारात ठेवू नका.
गणरायाचं कोणतं स्वरुप शुभ? (Which form of Lord Ganesha is auspicious?)
- घरात गणपतीची वाममुखी स्वरुपातील मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख-शांती टिकून राहते. आणि प्रगती होते.
- दक्षिणमुखी गणपतीच्या पूजेचे वेगळे नियम असतात. जर पूजा योग्य पद्धतीने केली गेली नाही तर त्याचे परिणाम फार उलटे होऊ शकतात.
गणपतीच्या कोणत्या मूर्तीने मिळतो लाभ? (Which idol of Ganesha provides benefits?)
- ज्या लोकांना संतान प्राप्तीची इच्छा असेल तर गणपतीच्या बाल स्वरुपाच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. ती अत्यंत शुभ मानली जाते.
- तुम्हाला जर करिअर आणि व्यवसायात काही अडथळे येत असतील तर शेंदूर स्वरुपातील गणपतीचा फोटो घरात लावा.
- घरात प्रवेश करताच सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी घराच्या मुख्य दरवाजापाशी मूषक वाहन गणपतीची प्रतिमा स्थापित करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :