Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थी 1, 2 नाही, तब्बल 5 महाशुभयोगात साजरी होणार! 'या' 5 राशींवर बाप्पा खूश, मागाल ती इच्छा पूर्ण होईल..
Ganesh Chaturthi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा गणेश चतुर्थीला 1-2 नव्हे तर 5 अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. गणपती बाप्पा येताच ते 5 राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव होईल.

Ganesh Chaturthi 2025: सुखकर्ता...दु:खहर्ता...विघ्नविनाशक तू गणराया... बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून या दिवशी लाडका बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी येणार आहे. मान्यतेनुसार, दरवर्षी सुख आणि समृद्धीचे दाता गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांमध्ये राहतात.या काळात भाविक सुद्धा आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा करतात, या काळात गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे त्रास दूर करतात, त्यांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देखील देतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, या वर्षी 10 दिवसांचा गणेश उत्सव 5 महाशुभ योगात सुरू होत आहे. ज्याचा शुभ परिणाम 5 राशींवर होताना दिसणार आहे. ज्योतिषींच्यी मते या लोकांना, बाप्पांच्या आशीर्वादाने लवकरच मोठा जॅकपॉट लागणार आहे.
यंदाची गणेश चतुर्थी 5 शुभ योगांमध्ये साजरी होणार...
पंचांगानुसार, 27 ऑगस्ट 2025, भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, या वर्षी, सर्वार्थसिद्धी योग, रवि योग, ब्रह्म योग, इंद्र योग आणि प्रीती योग यांचे संयोजन आहे. या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होतील आणि 5 राशींना खूप शुभ परिणाम देतील. कोणत्या राशींसाठी गणेश चतुर्थी भाग्यवान ठरेल हे जाणून घ्या.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. गणपती बाप्पाच्या नावाने तुम्ही जे काही काम कराल ते यशस्वी होईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला नवीन संधी मिळतील.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, गणपती बाप्पाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. प्रगतीची नवी दारे उघडतील. कीर्ती वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, हा शुभ योग तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम देईल. व्यावसायिक जीवनासोबतच वैयक्तिक जीवनही चांगले राहील. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो. लग्न निश्चित होऊ शकते. नशिबाच्या पाठिंब्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते, जी ऐकून तुम्ही आनंदी व्हाल. अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. तुम्ही सहलीला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल. तुमची प्रशंसा होईल.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. व्यवसायात नफा होईल. तुम्ही गुंतवणूक करू शकता. तसेच, ही तुमची सर्जनशीलता दाखविण्याची वेळ आहे. तुम्हाला आदर मिळेल. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















