Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मामध्ये गणेश प्रथम पूजनीय आहेत. गणपतीला आराध्य दैवत मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणेशाची (Lord Ganesha) आराधना केली जाते. यावर्षी 07 सप्टेंबर रोजी म्हणजेच (उद्या) बाप्पाचं आगमन होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला, म्हणून या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' (Ganesh Chaturthi 2024) म्हटलं जातं. यावर्षी तुम्ही गणेश चुतर्थीला तुमच्या राशीनुसर काही उपाय करुन पाहा. तुम्हाला याचा फायदा होईल. तुमच्या राशीनुसार हे उपाय केल्या बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील.


मेष रास : मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. यासोबतच गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.


वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक रूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल.


मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतील मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला काळी ब्लँकेट दान करावं.


कर्क रास : कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे तुमच्यासाठी शुभ राहील.


सिंह रास : या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील श्री गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.


कन्या रास : कन्या राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. 


तूळ रास : तूळ राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला पाच नारळ अर्पण करावेत.


वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान 'श्वेतर्क गणेश' (पांढऱ्या रंगातील गणेशाची मूर्ती) स्वरुपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील.


धनु रास : या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.


मकर रास : मकर राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्तीविनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात. बाप्पाच्या चरणी पिवळं फुलं अर्पण करणं देखील शुभ राहील.


कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक स्वरूपाची पूजा करावी. गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहिल.


मीन रास : मीन राशीच्या व्यक्तींनी हरिद्र गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची स्थापना करताना 'या' दिशेला करा; जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?