Ganesh Chaturthi 2022 : गणपतीला आद्य पूज्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण केले जाते. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेशाची जयंती साजरी होणार आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरांपासून घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, संपूर्ण 10 दिवस बाप्पाची पूजाअर्चा करून बाप्पा लवकर यावे, या इच्छेने त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेशमूर्तीची स्थापना करून श्रीगणेशाची विशेष पूजा करण्यात येणार आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना विशिष्ट पद्धतीने केली जाते. गणेश चतुर्थीला श्री गणेशाची मूर्ती कोणत्या मुहूर्तावर आणि कोणत्या पद्धतीने स्थापन करावी ते जाणून घेऊया.


 


गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीची प्रारंभ तारीख: 30 ऑगस्ट, मंगळवार, 03:34 वा
गणेश चतुर्थीची समाप्ती तारीख: 31 ऑगस्ट, बुधवार, दुपारी 03:23 वाजता.
गणपती स्थापनेचा मुहूर्त: 31 ऑगस्ट, बुधवार, सकाळी 11:05 आणि 1 सप्टेंबर, 01:38 पर्यंत सुरू राहील.


या पद्धतीने करा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
-गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना नियमानुसार करावी. मूर्ती स्थापनेची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
-प्रथम चौरंगावर पाणी शिंपडा आणि ते शुद्ध करा.
-यानंतर चौरंगावर लाल कापड पसरून त्यावर अक्षता ठेवा.
-या चौरंगावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
-आता गणपतीला स्नान घाला किंवा गंगाजल शिंपडा.
-मूर्तीची प्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा की मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी रिद्धी-सिद्धी म्हणून ठेवावी.
-गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा.
-हातात अक्षता आणि फुले घेऊन देवाचे ध्यान करावे.
-गणेशाच्या ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.


गणेशाची मूर्ती कशी असावी?
मान्यतेनुसार घर आणि मंदिरात गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. त्या मूर्ती सिद्धीपीठाशी संबंधित आहेत. अशी गणरायाची मूर्ती घरात बसवली जात नाही असे मानले जाते. तर दुसरीकडे ज्या मूर्तीमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळलेली असते, ती मूर्ती घरात बसवता येते. गणेशाची मूर्ती घरात बसवल्याने सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Guru Pushyamrut Yog 2022 : आज गुरुपुष्यामृत योग! शुभ खरेदीचा महामुहूर्त! जाणून घ्या महत्व


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ