Gajkesari Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा देवगुरु ग्रह बृहस्पती आणि चंद्राच्या दरम्यान संबंध निर्माण होतो तेव्हा गजकेसरी राजयोग निर्माण होतो. हा फार प्रभावशाली आणि शुभ योग मानला जातो. पंचांगानुसार, 26 मार्च 2026 रोजी गुरु आणि चंद्र ग्रहाच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे.

सध्या गुरु ग्रह आधीपासूनच मिथुन राशीत विराजमान आहे. 26 मार्च रोजी चंद्रसुद्धा याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, कोणत्या तीन राशींसाठी हा योग शुभकारक असेल ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फार लाभदायक ठरेल. हा योग तुमच्या लग्न राशीत जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाची नवीन साधनं निर्माण होतील. चांगली पगारवाढ मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फार सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या स्थानी हा राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. जर तुम्हाला एखादी नवी योजना राबवायची असेल तर ती तुम्ही सुरु करु शकता. हा चांगला काळ मानला जातो. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली असेल. मात्र, पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणं लाभदायी ठरेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. पार्टनरशिपमध्ये तुम्ही चांगला व्यवसाय कराल. तसेच, तुमचं ध्ये गाठाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तसेच, घरात आनंदी वातावरण राहील. 

हे ही वाचा :                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या राशींना मालामाल करणार? कोणती राशी ठरेल लकी? साप्ताहिक राशीभविष्य