Gajkesari Rajyog 2026: ते म्हणतात ना... आयुष्यभर माणसाने कितीही मेहनत केली तरी त्याला त्याच्या कष्टाचे फळ योग्य वेळीच मिळते. एकदा का नशीब चमकले की मग त्याची प्रगती होत जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतींना विशेष महत्त्व आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण राजयोग तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु यापैकी सर्वात प्रभावशाली 'गजकेसरी राजयोग' मानला जातो. मार्च 2026 च्या अखेरीस गुरू आणि चंद्राच्या युतीने तयार होणारा हा योग, काही राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. भाग्यशाली राशींबद्दल जाणून घ्या..
गजकेसरी योग कोणत्या राशींसाठी शुभ मानला जातो? (Gajkesari Rajyog 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग हा सर्वात शुभ आणि शक्तिशाली योगांपैकी एक मानला जातो. विशेषतः, 26 मार्च 2026 रोजी मिथुन राशीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे हा अत्यंत फलदायी राजयोग तयार होईल. गजकेसरी राजयोग तयार होणार असून, तो या 3 राशींसाठी कार्यक्षेत्रात नवीन संधी घेऊन येईल, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करेल.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, हा राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी वरदान आहे, कारण तो त्यांच्याच राशीत तयार होत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमचे स्थान आणि प्रभाव वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. जर तुम्ही भूतकाळात गुंतवणूक केली असेल, तर आता त्याचे फायदे मिळवण्याची वेळ आली आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि प्रभावशाली लोकांशी असलेले तुमचे संबंध अधिक दृढ होतील.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी, हा योग अकराव्या घरात तयार होईल, ज्याला 'लाभाचे स्थान' म्हणून ओळखले जाते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी एखादा मोठा करार अंतिम करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. कुटुंबात शुभ घटना घडतील आणि तुम्ही चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल.
कन्या (Virgo)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी, हा राजयोग त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. ज्यांना परदेशात काम करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही अत्यंत कठीण आव्हानांवरही सहजपणे मात करू शकाल.
हेही वाचा>>
Shani Vakri 2026: पुढचे 138 दिवस शनि अधिक पॉवरफुल, 3 राशींना दिवाळीपर्यंत बंपर लाभ! शनिची वक्री चाल, कर्जमुक्ती, साडेसातीतून दिलासा, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
