Gajkesari Rajyog 2026: माणसाच्या आयुष्यात चांगले - वाईट दिवस येत राहतात. अनेकदा खूप मेहनत करूनही यश हाती लागत नाही, तर काही वेळेस जास्त मेहनत न करताही यश तुमच्या पदरात असते, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, तुमच्या चांगल्या - वाईट दिवसामागे ग्रहांची शुभ-अशुभ स्थिती कारणीभूत ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार, 26 मार्च 2026 रोजी, ज्या दिवशी राम नवमी आहे, त्या दिवशी ग्रहांचा शक्तिशाली राजयोग बनतोय, ज्यामुळे अनेक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशीबद्दल...

रामनवमीलाच बनतोय पॉवरफुल गजकेसरी राजयोग..(Gajkesari Rajyog 2026)

ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेसरी राजयोग हा सर्वात शुभ आणि शक्तिशाली योगांपैकी एक मानला जातो. तसं पाहायला गेलं तर ग्रहांच्या हालचाली आणि त्यांच्या युतींना विशेष महत्त्व आहे. जेव्हा शुभ ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. 2026 मध्ये, गजकेसरी राजयोग नावाचा असाच एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग तयार होत आहे. विशेष म्हणजे हा योग रामनवमीच्या दिवशी तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 26 मार्चपासून ग्रहांची स्थिती अशी असेल की 3 राशींचे भाग्य उजळू शकेल आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतील. 

गजकेसरी राजयोग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरू आणि चंद्र पत्रिकेत युतीत असतात किंवा एकमेकांपासून केंद्रस्थानी असतात, तेव्हा "गजकेसरी राजयोग" तयार होतो. "गज" म्हणजे हत्ती, जो बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे, आणि "केसरी" म्हणजे सिंह, जो धैर्य आणि वर्चस्वाचे प्रतीक आहे. हा योग प्रचंड संपत्ती, आनंद, समृद्धी आणि समाजात उच्च स्थान प्रदान करतो.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ मिथुन राशीसाठी आशीर्वादाचा असेल. गुरू आणि चंद्राची ही युती तुमच्या राशीत होण्याची शक्यता असल्याने, तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरदारांना पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला करेल. हा योग तुमच्या उत्पन्नाच्या घरावर प्रभाव टाकेल, ज्यामुळे पैशाचा ओघ वाढेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. व्यावसायिक एखादा मोठा व्यवहार पूर्ण करू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुम्हाला सक्रिय राहण्याची गरज आहे.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आणि यश आणेल. तुमची निर्णयक्षमता मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नशिबाची साथ मिळाल्याने, तुमची प्रलंबित कामेही मार्गी लागतील.

हेही वाचा>>

April 2026 Astrology: एप्रिलमध्ये 7 राशींच्या आयुष्यात शुभवार्तांचा धमाका! तब्बल 19 वेळा चंद्र नक्षत्र बदलणार, 'असा' बदल घडणार की, पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)