Gajkesari Rajyog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मेचा महिना फारच खास मानला जातो. खरंतर मे (May 2026)महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या मध्यातच गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. हा योग (Yog)ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचा मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, 18 मे 2026 रोजी चंद्र ग्रह मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या राशी परिवर्तनामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच बृहस्पती ग्रह विराजमान आहे. याचा कोणकोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.

असं म्हणतात की, या योगामुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते. तुमची तणावापासून सुटका होते. तसेच, प्रगतीचे मार्ग खुले होतात. या योगामुळे मानसिक शांती, आर्थिक मजबूती आणि नात्यात सुधार पाहायला मिळतो. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हा काळ विश्रांतीचा असणार आहे. जुन्या वादविवादापासून तुमची सुटका होईल. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. उत्पन्नाची अनेक साधनं निर्माण होतील. तसेच, या दरम्यान तुम्ही फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. या काळात नातं आणि करिअर या दोघांमध्ये तुम्हाला समान समतोल साधता येईल. जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळेल. तसेच, तुमच्या कामाने लोक प्रभावित होतील. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी हा काळ स्थिरतेचा असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात संतुलन टिकून राहील. दीर्घ काळापासून सुरु असलेल्या अनेक समस्या मिटतील. तसेच, तुमच्या कामात प्रगती पाहायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी हा काळ आत्मसन्मानाचा असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. जुने वादविवाद मिटतील. तसेच, एखादी गोष्ट तुमच्या विश्वासू व्यक्तीला सांगितल्याने तुमचं मन हलकं होईल. कामात गती आणि प्रगती दिसून येईल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shubh Yog 6 May 2026 : आज सिद्ध योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्या राशीसह 5 राशींच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा लकी राशी